लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मतमोजणीची जबाबदारी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला निश्चित करून देण्यात आली आहे. ही जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी टपाली मतपत्रिका मोजणी पथक, मतमोजणी मनुष्यबळ व्यवस्थापन पथक, साहित्य व्यवस्थापन पथक, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे सहायक पथक, सिलिंग पथक, मतमोजणी समन्वय व अहवाल संकलन पथक या पथकांचा आढावा घेतला. त्यांना योग्य त्या सूचना केल्या. त्याच प्रमाण मतमोजणीच्या ठिकाणी असलेला पोलीस बंदोबस्त, आरोग्य सुविधा, इंटरनेट सुविधा, मीडिया कक्ष याबाबतची माहिती घेऊन संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले.मतमोजणी केंद्रात मतमोजणीच्या दिवशी मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले.यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. मोहीत गर्ग, अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, दामोधर नान्हे, महेश पाटील, कल्पना निळ यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.
मतमोजणीचे काम काटेकोरपणे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:10 PM
मतमोजणीची जबाबदारी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला निश्चित करून देण्यात आली आहे. ही जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : मतमोजणी केंद्राला दिली भेट