गडचिराेली : अलीकडे चायनिज पदार्थांची सर्वांनाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की, बरेच जण चायनिज खाण्याचाच बेत आखतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन करणे आराेग्यासाठी धाेकादायक आहे. जास्त प्रमाणात किंवा नेहमी चायनिज पदार्थ खाल्ल्यास पाेटाच्या विविध आजारांना निमंत्रण मिळते.
महाराष्ट्रीयन मानसाला चायनिज गाेष्टीचे आकर्षण सुरूवातीपासूनच आहे. अगदी चिनी बनावटीच्या वस्तुंपासून ते चायनिज पदार्थांपर्यंत आकर्षण कायम आहे. चीनमध्ये मिळणारे चायनिज पदार्थ व महाराष्ट्र तसेच भारत देशात मिळणारे चायनिज पदार्थ यात फरक आहे. अनेक भाज्या, साॅस, सूप व बऱ्याच पदार्थांमध्ये अजिनाेमाेटाेचा वापर चांगल्या रितीने मिसळून केला जाताे. मात्र हा पदार्थ अधिक प्रमाणात वापरल्या गेल्यास पदार्थाची चव बिघडते असे नाही. मात्र यापासून तयार हाेणारे पदार्थ खाणाऱ्यांचे आराेग्यही बिघडू शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
बाॅक्स...
काय आहे अजिनाेमाेटाे?
अजिनाेमाेटाे हे एक प्रकारची केमिकल प्रक्रिया तयार करून केलेला चटणीसारखा पदार्थ त्याला एमएससी म्हणजेच माेनाेसाेडियम ग्लुमेट असही म्हटले जाते. तसेच एनिमाे ॲसिड असेही संबाेधले जाते. ॲमिनाे ॲसिडचा वापर करून पदार्थ बनविला जात असल्याने त्याला अजिनाेमाेटाे असे म्हणतात.
बाॅक्स...
म्हणून चायनिज
खाणे टाळा
चायनिज पदार्थामध्ये अजिनाेमाेटाेचा वापर स्वाद वाढविण्यासाठी केला जाताे. त्याचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास आराेग्यावर वाईट परिणाम हाेतात. गर्भवती महिलांनी याचे सेवन करू नये, कारण बाळावरही परिणाम हाेण्याची शक्यता असते. याशिवाय ॲसिडिटी, अल्सर हाेऊ शकते.
बाॅक्स.....
नियंत्रण कुणाचे?
चायनिज पदार्थावर अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण असणे अन्न सुरक्षा कायद्यात तरतुद आहे. मात्र गडचिराेली जिल्ह्याच्या शहरी भागात विकल्या जाणाऱ्या चायनिज पदार्थ व ठेवल्यावर या विभागाचे नियंत्रण दिसून येत नाही. प्रशासनाच्या वतीने गेल्या दाेन ते तीन वर्षांत एकदाही तपासणी माेहीम दिसली नाही.
बाॅक्स ....
या पदार्थांचा वापर
चायनिज पदार्थांमध्ये माेनाेसाेडियम ग्लुमेट, शेजवान साॅस, कृत्रिम रंग, स्टार्च काॅर्न यासारखे पदार्थ वापरले जातात. याशिवाय नूडल्स अर्धेकच्चे शिजविले जात असल्याने पचायला हानिकारक आहेत. मैदा व पाॅलिश केलेला तांदूळ वापरतात. कच्चा काेबी पचायला जड असते. त्यामुळे पाेटदुखीचा त्रास हाेऊ शकताे.
काेट ......
रस्त्याशेजारी व फुटपाथवर चायनिज पदार्थ सहज उपलब्ध हाेत आहे. ते खाण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. यात तेल व भाज्यांचा वापर केला जाताे. आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या अजिनाेमाेटाेमुळे पचनसंस्थेसह शरीराचेही नुकसान हाेते. अनेक विकार उद्भवतात.
- डाॅ. सारंग काेटरंगे, वैद्यकीय अधिकारी, गडचिराेली