गडचिराेली : लग्नासाठी हुंडा घेतला किंंवा हुंडा दिल्यास पदवी रद्द करण्याचा निर्णय केरळ राज्यातील विद्यापीठाने घेतला आहे. याबाबत असा निर्णय महाराष्ट्र राज्यात झाला नसला तरी, प्रत्यक्षात हुंडा घेण्याचे प्रमाण बरेच आहे. सध्याची उपवर मुले हुंडा घेण्याच्या तयारीत नसतात. मात्र त्यांचे आई-वडील हुंड्याची अट आग्रहीपणे टाकतात.
मुलांचे शिक्षण, नाेकरी तसेच पुढील आयुष्यासाठी मदत व्हावी म्हणून आई-वडील लग्न ठरविताना हुंड्याची अट घालतात. उपवर अर्थात मुलांची अपेक्षा नसली तरी, मुलीच्या वडिलांकडून रितसर थाटामाटात लग्न करून हुंडा घेतला जाताे. काही ठिकाणी हुंडा न घेताही साधेपणाने लग्नकार्य पार पाडले जाते. परंतु जे कुटुंब हुंडा देऊ शकत नाही किंवा ज्या कुटुंबांनी किंवा इतर अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, तर संबंधित मुलींना विवाहानंतर सासरी त्रास दिल्या जाताे. सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी नवविवाहित सुनेचा छळ केला जात असल्याच्या घटनाही गडचिराेली जिल्ह्यात मागील काही वर्षात घडल्या आहेत. हुंडाबंदी कायद्याची अंमलबजावणी हाेणे गरजेचे आहे.
बाॅक्स .....
हुंडाविराेधी कायदा काय?
हुंडा देणे व घेणे ही परंपरेने अस्तित्वात असलेली अनिष्ट प्रथा आहे. हुंड्यापायी छळ हाेऊन अनेक युवतींना विविध अडचणींचा सामना करावा लागताे. परिणामी हुंडा पद्धतीमुळे कुटुंबाची हानी हाेते. त्यामुळे सरकारने हुंडाबंदी कायदा अंमलात आणला. हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ च्या कलम ३ अन्वये हुंडा देणे किंवा घेण्याबद्दल संबंधिताला कमीत कमी पाच वर्षे मुदतीच्या कारावासाची व कमीत कमी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले असून हुंडाविराेधी जनजागृती केली जात असल्याने हुंडा घेणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
काेट ..
मुलांच्या मनात काय?
लग्नकार्य करताना मुलीचे शिक्षण व स्वभाव तसेच इतर गुण पाहणे आवश्यक आहे. मात्र सध्याच्या काळात देण्या-घेण्याच्या किरकाेळ बाबींवर लग्न माेडणे हे चुकीचे आहे.
- उपवर
ग्रामीण भागात हुंडा म्हणून राेख स्वरूपात पैसा मागितला जाताे. अनेक मुलींच्या वडिलांची परिस्थिती नसतानासुद्धा हुंडा देण्याचा हट्ट केला जाताे. हे याेग्य नाही.
- उपवर
काेट .....
मुलांच्या पालकांना काय वाटते?
मुलांच्या शिक्षणापासून तर नाेकरी लागेपर्यंत बराच खर्च येताे. मुलाचे वडील आर्थिक अडचणीत असल्यास मदत म्हणून आर्थिक सहकार्य व्हावे.
- उपवराचे वडील
मुलींच्या वडिलांकडून हुंडा स्वीकारण्यापेक्षा मुला-मुलींचे आयुष्य घडविण्यासाठी आर्थिक स्थैर्यासाठी प्रयत्न व्हावेत, जेणेकरून अडचणी येणार नाहीत.
- उपवराची आई
काेट .....
मुलींच्या मनात काय?
सध्या शिक्षण व विविध कलाकाैशल्याला माेठे महत्त्व आहे. वराकडील मंडळींनी या गाेष्टीला महत्त्व दिले पाहिजे. हुंड्याची अट घालणे अशाेभनीय व अयाेग्य आहे.
- उपवधू
आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी असली, तर मदत म्हणून सहकार्य करणे हरकत नाही. मात्र परिस्थिती नसतानाही, इतकाच हुंडा पाहिजे, अशी अट नकाे.
- उपवधू
काेट .....
मुलींच्या पालकांना काय वाटते?
मुलींचे लग्नकार्य म्हटले की बराच खर्च येताे. त्या हुंड्याच्या माेठ्या रकमेची मागणी झाल्यास प्रचंड ताणतणाव येतो. शासन व प्रशासनाने हुंडा प्रतिबंधक कायद्याची जनजागृती करावी.
- वधुपिता
मुलगी सासरी सुखात राहावी, यासाठी तिच्या आई-वडिलांची माेठी धडपड असते. यासाठी काही पालक हुंडा देण्यासाठी तयार हाेतात. मात्र ही पद्धत सामाजिकदृष्ट्या चुकीची आहे.
- वधुपिता