लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने जलजीवन मिशन अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत प्रत्येक गावात 'हर घर जल'चा नारा सुद्धा दिला जात आहे. परंतु, ही याेजना कागदावरच असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात सदर याेजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष हाेत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी म्हणजे दिवास्वप्नच ठरत आहे.अशुद्ध पाण्यामुळे विविध आजार बळावतात. सर्वाधिक आजार पाण्याच्या अशुद्धतेमुळेच हाेतात. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची शासकीय यंत्रणेची योजना आहे. यासंबंधी याेजना राबविण्याचे काम जिल्हास्तरावरील यंत्रणा करते. परंतु हीच यंत्रणा याेग्य प्रकारे कामांचे कार्यान्वयन करीत नसल्याने राेज ५५ लिटर शुद्ध पाणी केव्हा मिळणार, असा सवाल आहे.
काय आहे जलजीवन मिशन?
नागरिकांना नळयाेजनेद्वारे घराेघरी पिण्याचे शुद्ध पाणी पाेहाेचविण्यासाठी जलजीवन मिशन याेजना राबविली जात आहे. या याेजनेंतर्गत प्रत्येक गावातील कुटुंबांना नळयाेजनेचे कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे.
अनेक गावांत पाईपलाईन अपुरीजलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावांत नळयाेजनेची पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु, बहुतांश गावांत पाईपलाईन अपुरी आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरापर्यंत पिण्याचे पाणी पाेहाेचले नाही. नागरिकांना हातपंप, विहिरीचेच पाणी घरी आणावे लागत आहे. त्यामुळे ही याेजना काही ठिकाणी अपयशी दिसून येते.
जुन्या नळ याेजना बंद, गावांमध्ये पाणीटंचाई
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जुन्या नळ याेजना आहेत. सदर नळ याेजना तीन ते चार वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण हाेते. ही स्थिती एप्रिल व मे महिन्यात उद्भवते. जुन्या याेजना बंद असतानाच नव्या वाढीव नळ याेजना सुरू करण्याचा खटाटाेप केला जात आहे. यात किती प्रमाणात संबंधित विभागाला यश मिळते, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाणीटंचाई निर्माण हाेऊ नये, यासाठी प्रयत्न हवे.
पाणीटंचाईची समस्या हाेणार तीव्रपाल नदी, कठाणी, खाेब्रागडी, वैलाेचना यासह अहेरी भागातील अनेक नद्यांवरील नळ याेजना बंद आहेत.
काही ठिकाणी विहिरींना पाणी नाही, तर काही ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित आहे.
सरपंच काय म्हणतात...हर घर जल याेजनेद्वारे नागरिकांच्या दारात नळ याेजनेचे पाणी पाेहाेचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नि:शुल्क नळ कनेक्शन दिले जात असले तरी स्थानिक स्तरावर उलट स्थिती दिसून येते, असे एका सरपंचाने सांगितले.