यूपीआयने जाेडलेले खाते एकदाच पिन नंबर विचारते. अनेकांना पिन नंबर लक्षात राहत नाही; त्यामुळे नागरिक पिन नंबरही माेबाईलमध्येच सेव्ह करून ठेवतात. ताेही पिन नंबर याच नावाने सेव्ह राहतो. ही बाब चाेरट्यांना माहीत असल्याने तो ते सहज शाेधून बघतात. विशेष म्हणजे एखाद्याला फाेन लावायचा आहे, असे सांगून फाेन मागत असल्याने आपणही त्याकडे लक्ष देत नाही. मात्र यातच घाेळ हाेतो आणि काही कालावधीतच आपले पैसे दुसऱ्या खात्यात वळते केले जातात व आपली फसवणूक हाेऊ शकते.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
बाॅक्स
ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाते फसवणूक
वेगळी लिंक पाठवून
एक वेगळ्या प्रकारची लिंक पाठविली जाते. यासाेबतच ओटीपी नंबरही मागितला जातो.
लाॅटरी लागली आहे
आपल्याला लाॅटरी लागली आहे. बँक खात्यावर पैसे जमा करण्यासाठी ओटीपीची गरज असे सांगितले जाते.
केवायसीसाठी आवश्यक आहे असे सांगून बँक खात्याची केवायसी अपडेट करायची आहे. ओटीपीशिवाय केवायसी अपडेट हाेत नाही, असे सांगून.
फायनान्सची प्रक्रिया करण्यासाठी
तुम्ही फायनान्स घेतला आहे. काही प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
ही काळजी घ्या
१) शिकला-सवरलेला दिसत असेल मात्र ताे जर आपला माेबाईल मागत असेल तर त्याच्या हातात माेबाईल देऊ नका. फाेन करण्यासाठी माेबाईल दिला असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवा.
२) बँक कधीही फाेन करून बँक खात्याची माहिती विचारत नाही. त्यामुळे बँकेतून बाेलताे असे सांगितला तरी त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका.
३) पिन नंबर, सीसीव्ही नंबर माेबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू नका.