डॉ. आंबेडकर विद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. १६४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले हाेते. यापैकी २९ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, ८६ प्रथम श्रेणीत तर ४९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तनुजा नरेंद्र नखाते हिने ९६.८० टक्के, आचल लीलाधार बोडणे हिने ९५ टक्के, प्रणय डंबाजी कलसार याने ९४.२० टक्के, जयश्री सुरेश म्हशाखेत्री ९३.८० टक्के, सुकेशनी नागसेन गोडसे ९३ टक्के, कुलदीप सुभाष आंबेकर ९१.६० टक्के, श्रुती संजय चहांदे हिने ९१ टक्के गुण मिळविले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थाध्यक्ष मदन मेश्राम, सचिव ॲड. प्रशांत मेश्राम व प्राचार्य व्ही. जी. शेंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक एन. डी. गेडाम, हंसराज बडोले, के. डी. बांबोळे, पी. एन. खोब्रागडे तसेच शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक हंसराज बडोले, संचालन के.डी. बांबोळे तर आभार ए. एल. सोमनकार यांनी मानले.
190721\img_20210719_170623.jpg
आरमोरी येथील डॉ. आंबेडकर विद्यालयात प्रावीन्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संस्थाध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक