लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गडचिरोली शहरातील घरकुलांसाठी पाच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मंगळवारी या घरकुल बांधकामाचे भूमिपूजन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, प्रशांत खोब्रागडे, रमेश भुरसे, गुलाब मडावी, केशव निंबोड, नितीन उंदीरवाडे, वैष्णवी नैताम, लता लाटकर, मंजुषा आखाडे, मुख्याधिकारी संजीव ओहोड, नगर परिषदेचे अभियंता अतुल पाटील, अविनाश बंडावार, नगररचना सहाय्य गिरीष मैंद, प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता गहाणे, एमआयएस स्पेशालिस्ट काळे यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, घरकुलाच्या कामाला गती मिळाली पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. देशातील प्रत्येक घर पक्के असावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे. २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला पक्के घर उपलब्ध होईल, या दृष्टीने शासन गंभीर असून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्रशासनाने कामाची गती वाढवावी, असे निर्देश दिले. खासदार अशोक नेते यांच्या हस्ते लाभार्थी एजाज असद अली, क्षमा जावेद शेख, अरूण मंगर, नरेश महाडोळे, तुकाराम गुरनुले यांना बांधकाम मंजुरीचे प्रमाणपत्र, बांधकामाचा नकाशा, शुभेच्छापत्र देण्यात आले.७३ लाभार्थ्यांना घरकूल मंजूरफुले वार्डातील २५६ घरांचा डीपीआर मंजूर करण्यात आला. त्यापैकी १९३ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ७३ लाभार्थ्यांच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. एक वर्षापूर्वीच डीपीआर मंजूर करण्यात आला होता. मात्र निधी मिळाला नसल्याने घरकुलांचे बांधकाम थांबले होते. निधी कधी उपलब्ध होणार याबाबत नागरिकांकडून नगर परिषद प्रशासनाला वेळोवेळी विचारणा केली जात होती. मात्र निधी मिळाल्याने आता घरकुलांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
घरकुलाचे स्वप्न होणार साकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 1:17 AM
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गडचिरोली शहरातील घरकुलांसाठी पाच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मंगळवारी या घरकुल बांधकामाचे भूमिपूजन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.
ठळक मुद्देबांधकामाचे भूमिपूजन : गडचिरोली नगर परिषदेअंतर्गत कामांचा शुभारंभ