बाॅक्स..
खासगी व्यक्तीही करू शकते तपासणी
जलसुरक्षकामार्फत केवळ सार्वजनिक जलस्रोतांचे नमुने घेतले जातात. एखाद्या व्यक्तीला स्वत:च्या घरच्या बाेअरवेल किंवा विहिरीच्या पाण्याची तपासणी करायची असल्यास तसा अर्ज जवळपासच्या प्रयाेगशाळेत करावा लागताे. गडचिराेली, अहेरी, आरमाेरी चामाेर्शी, कुरखेडा या ठिकाणी शासकीय पाणी तपासणी प्रयाेगशाळा उपलब्ध आहेत. पाणी तपासणीसाठी जवळपास ४५० रुपये शुल्क आकारले जाते.
बाॅक्स...
इतर कामांसाठी वापर शक्य
पाण्यातील रासायनिक घटकांचे प्रमाण अतिशय कमी किंवा जास्त झाल्यास ते पाणी पिण्यासाठी अयाेग्य मानले जाते. त्या विहिरीवर लाल अक्षरात खूण केली जाते. मात्र कपडे धुणे, आंघाेळ करणे आदी कामांसाठी या पाण्याचा वापर करणे शक्य आहे.
बाॅक्स...
आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या
पिण्याचे पाणी कधी-कधी अनुजैविक घटकांमुळे दूषित हाेते. अशावेळी पाणी उकळून पिणे हा सर्वांत चांगला उपाय आहे. विशेष करून ग्रामीण भागातील विहिरींचे जलस्रोत दूषित हाेतात. त्यामुळे विहिरीतील पाणीसुद्धा दूषित हाेण्याचा धाेका राहतो. पाणी उकळल्यामुळे जीवजंतू नष्ट हाेतात.
काेट...
पाण्याच्या जलस्रोताच्या सभाेवताल स्वच्छता असणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीसह गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. वर्षातून किमान एकदा तरी पाण्याची तपासणी करून घ्यावी. पाणी पिण्या अयाेग्य असल्याचा अहवाल मिळाल्यानंतर त्या ठिकाणचे पाणी पिण्यासाठी वापरू नये.
- प्रशांत गाेलांगे, सहायक भूवैज्ञानिक, गडचिराेली.
बाॅक्स....
तालुकानिहाय अयाेग्य पाणी नमुने
तालुका रासायनिक अनुजैविक
गडचिराेली १६२ ०
धानाेरा ५० ०
अहेरी ३३ ७
भामरागड ३४ ०
एटापल्ली ३७ १४
सिराेंचा १९ ९
आरमाेरी ५६ १५
देसाईगंज ३१ ५
चामाेर्शी १२८ ६
मुलचेरा २२ ०
कुरखेडा २२ १
काेरची ९ ३
एकूण ६०३ ६०