शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
2
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
4
शत्रूला शोधून करणार खात्मा, रोबोटिक श्वान का आहे खास?
5
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
6
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
7
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
8
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
9
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
10
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
11
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
12
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
13
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
14
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
15
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
16
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
17
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
18
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
20
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल

नक्षल्यांच्या हालचालींवर ड्रोनची करडी नजर, सीमेवर जवान अलर्ट मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 2:45 PM

१७ हजार सुरक्षारक्षकः निर्भीड वातावरणात मतदान होण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील गडचिरोलीत विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस दलातील सी-६० हे विशेष पथक सज्ज झाले आहे. एकीकडे प्रभावी नक्षलविरोधी मोहीम, दुसरीकडे आत्मसमर्पण यामुळे नक्षल चळवळीला एकामागून एक धक्के बसत आहेत. मात्र, निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी नक्षल्यांच्या प्रत्येक हालचालीवर अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. 

लोकसभा निवडणुकीत एका मतदान केंद्रावरील हल्ल्याचा प्रयत्न हा एकमेव अपवादवगळता शांततेत मतदान झाले. निवडणुकीपूर्वीच नक्षल्यांचे मनसुबे उधळून लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले होते. 

आता विधानसभा निवडणुकाही शांततेत व सुरक्षित वातावरणात व्हाव्यात, याकरिता पोलिस दलाकडून व्यूहरचना आखली जात आहे. छत्तीसगड व तेलंगणा सीमेवर १४ ठिकाणी आंतरराज्य तपासणी नाके सुरू केली असून, परराज्यातून येणाऱ्या व गडचिरोलीतून तिकडे जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. पोलिसांकडे १३० अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे असून त्याचा वापर केला जात आहे. जिल्हाभरात १७ हजार सुरक्षा जवानांची कुमक निवडणुकीसाठी तैनात राहणार आहे. कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

३० जहाल माओवाद्यांनी सन २०२२ पासून आतापर्यंत आत्मसमर्पण केले आहे. हिंसक चळवळीत असलेल्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आतापर्यंत एकही गुन्हा नाही दरम्यान, जिल्हा अतिसंवेदनशील व नक्षलप्रभावित असतानाही सुदैवाने आतापर्यंत एकही अनुचित घटना घडलेली नाही. १५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून आतापर्यंत कायदा - सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल, असा एकही गुन्हा नोंद झालेला नाही. यासाठी पोलिसांचे सुक्ष्म नियोजन कामी आले आहे.

सन २०१९ मध्ये काय घडले होते ? आचारसंहिता कालावधीत ७ गुन्हे दाखल झाले होते. नक्षल्यांनी सुरक्षा जवानांवर हल्ला केला होता. यात चौघे जखमी झाले होते. सुरक्षेचा नियमित आढावा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. याशिवाय गुप्तचर यंत्रणेकडूनही माहिती घेतली जात आहे. केंद्रीय सुरक्षा दलासह राज्याच्या सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाञ्चायतन माडचिरोली पोलिसांकडून सतत आढावा घेतला जात आहे.

"लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही सुरक्षित वातावरणात पार पडेल. छत्तीसगड सीमेवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. सी-६० या जवानांमार्फत नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. जनतेने कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजवावा." - नीलोत्पल, पोलिस अधीक्षक

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी