शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

जिल्ह्यात यंदा कोरड्या दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 5:00 AM

गडचिरोली जिल्ह्यातील मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प १९८० च्या कायद्यामुळे रखडले आहेत. कृषी विभाग, रोहयो तसेच धडक सिंचन व इतर योजनांमधून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शेतात सिंचन विहीर बांधून सिंचन सुविधा केली. मात्र अशा शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात अल्प आहे. येथील ८० टक्के शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला नाही.

ठळक मुद्देमुसळधार पावसाची प्रतीक्षाच : अनेक ठिकाणचे धानपºहे करपले, झालेली रोवणी अडचणीत, शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. ही शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र यंदा जिल्ह्यात फार कमी पाऊस पडला. जुलै महिना संपूनही मुसळधार पावसाचा पत्ता नाही. शेतातील धानपऱ्हे व झालेली रोवणी करपायला लागली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे.गडचिरोली जिल्ह्यातील मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प १९८० च्या कायद्यामुळे रखडले आहेत. कृषी विभाग, रोहयो तसेच धडक सिंचन व इतर योजनांमधून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शेतात सिंचन विहीर बांधून सिंचन सुविधा केली. मात्र अशा शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात अल्प आहे. येथील ८० टक्के शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला नाही. यंदा एकदाही पूरपरिस्थिती निर्माण झाली नाही. परिणामी जिल्ह्यातील नदी, नाल्या, तलाव, बोड्या अत्यल्प पाणीसाठा आहे.कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी, शेतमजुरांचा यावर्षी दोन ते तीन महिन्यांचा रोजगार गेला. परिणामी कृषी क्षेत्रावरही या लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला आहे. अशाही परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने स्वत:ला उभे करून खरीप हंगामाची तयारी केली. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही बँकांकडून पीक कर्ज घेऊन शेती लागवडीचा खर्च भागविण्यावर भर दिला. मात्र पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी आता प्रचंड हवालदिल झाला आहे.गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत धानपीक लागवडीची टक्केवारी ४४.८९ आहे. ही आकडेवारी पºहे, रोवणी व आवत्या मिळून आहे. पाण्याअभावी रोवणीचे काम ठप्प पडले आहे.४३,७०२ हेक्टर क्षेत्रावर धान रोवणीगडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात मिळून एकूण आतापर्यंत ४३ हजार ७०२ हेक्टर क्षेत्रावर धानपिकाची रोवणी झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे एकूण क्षेत्र १ लाख ६८ हजार ४२० इतके आहे. यावर्षी अपेक्षित पाऊस न बरसल्याने धानपीक रोवणीचे काम बरेच मागे आहे. जिल्ह्यात ३१ हजार ८९८ हेक्टर क्षेत्रावर आवत्या आहे. कृषी विभागाच्या खरीप हंगाम पीक पेरणी अहवालानुसार रोवणी, पऱ्हे, आवत्या मिळून धान लागवडीची एकूण टक्केवारी ४४.८९ आहे. ८६० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. धान, मका, तूर, तीळ, सोयाबीन, कापूस यासह भाजीपाला तसेच कडधान्य व तृणधान्य मिळून सर्व पिकांची एकूण लागवडीची टक्केवारी ५१.९३ इतकी आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस धानपीक रोवणीची टक्केवारी ६० टक्क्यापेक्षा अधिक राहत होती. मात्र यंदा पावसाअभावी धानपीक रोवणीचे काम मागे पडले आहे.देलनवाडी परिसरात पऱ्हे वाळलेआरमोरी तालुक्याच्या मानापूर, देलनवाडी परिसरात गेल्या महिनाभरापासून जोरदार पावसाचा पत्ता नाही. या भागात ज्या शेतकऱ्यांकडे छोट्या-मोठ्या सिंचन सुविधा आहेत, त्यांनी कसेबसे आपल्या शेतात रोवणीचे काम आटोपून घेतले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअर तसेच नदी, नाला नाही, अशा शेतकऱ्यांचे रोवणीचे काम थांबले आहे. हे शेतकरी चातक पक्षासारखे आकाशाकडे टक लावून पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. आज ना उद्या मुसळधार पाऊस बरसेल, अशी आशा या भागातील शेतकऱ्यांना आहे. काही शेतजमिनीतील धानाचे पऱ्हे वाळत आहेत. एका शेतकऱ्यांनी उद्या नक्की पाऊस येईल, असा अंदाज बांधून आपल्या शेतात पºहे खोदून ठेवले. मात्र पाऊस न आल्याने खोदलेल्या पऱ्ह्याच्या पेंड्या वाळून गेल्या. या भागातील तलाव, बोड्या कोरडेच आहेत.रोवणीसाठी दिना धरणाचे पाणी सोडणारचामोर्शी तालुक्यात पाऊस बरसत असल्याने धानपीक रोवणीची कामे ठप्प पडली आहेत. दरम्यान शेतकऱ्यांची ही कामे पार पाडण्यासाठी दिना धरणातील पाणी १ ऑगस्ट रोजी शनिवारी सोडण्यात येणार आहे. आ.डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते जलपूजन करून धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. यासंदर्भात चामोर्शी येथे बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार संजय गंगथडे, कार्यकारी अभियंता मेश्राम, तालुका अभियंता घोलपे आदी उपस्थित होते. याशिवाय भाजपचे पदाधिकारी साईनाथ बुरांडे, दिलीप चलाख, सुरेश शहा, त्रियुगी दुबे महाराज, रितेश पालारपवार आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या सद्य:स्थितीतील समस्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस