शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

जिल्हा कचेरीसमोर कंत्राटदारांनी दिले धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 1:47 AM

केंद्र सरकार व राज्य सरकारने नवीन कर प्रणाली (जीएसटी) लागू केली. त्यामध्ये शासकीय कामासोबत वस्तू व सेवा कराच्या जुन्या व विविध कामाची भरपाई देण्यात यावी,......

ठळक मुद्देजुन्या कामावरील जीएसटी रद्द करा : जिल्हाधिकाºयांमार्फत राज्य सरकारकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र सरकार व राज्य सरकारने नवीन कर प्रणाली (जीएसटी) लागू केली. त्यामध्ये शासकीय कामासोबत वस्तू व सेवा कराच्या जुन्या व विविध कामाची भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी गडचिरोली जिल्हा कंत्राटदार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून मागण्या निकाली काढण्याची मागणी करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे की, देशातील विकासात्मक कामात नेहमी अग्रेसर असणाºया शासकीय कंत्राटदारास जुन्या कामांना जीएसटी कर प्रणाली लावल्यामुळे १८ टक्यांचे नुकसान कंत्राटदारांना सहन करावे लागत आहे. त्यामुळे ही जीएसटी कर प्रणाली जुन्या कामांपासून लवकरात लवकर काढण्यात यावी, अन्यथा कंत्राटदार संघटना संपूर्ण राज्यभरात कामबंद आंदोलन पुकारेल, असाही इशारा यावेळी संघटनेने दिला आहे.यावेळी संघटनेचे सचिव अजय तुम्मावार म्हणाले की, शासन विविध प्रकारच्या अटी लावून कंत्राटदाराचे हात बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. यात पाच वर्षे जुन्या मशिनरीज वापरता येणार नाही, मात्र आरटीओ १५ वर्षांची परवानगी देत आहे. पाच वर्षात जर नवीन मशिनरीज घ्यावी लागत असेल तर कंत्राटदाराला काम करणे अवघड जाणार आहे. हा निर्णय कंत्राटदारांच्या तोंडाला पाने पुसणारा आहे. यामुळे अनेक कंत्राटदार रस्त्यावर येतील, अशीही माहिती यावेळी सचिव तुम्मावार यांनी सांगितली.यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष आनंद श्रृंगारपवार म्हणाले की, जुन्या कामांवर दोन टक्के व्हॅट भरण्याची प्रणाली होती. त्याप्रमाणे नियोजन करून कामे केली जात होती. मात्र जुन्या कामांवर दोन टक्के व्हॅटऐवजी १८ टक्के जीएसटी लावण्यात आल्यामुळे कंत्राटदारांना १६ टक्क्यांचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. हा भुर्दंड कोणत्याही परिस्थिती कंत्राटदार सहन करणार नाहीत. त्याकरिता कामबंद करून उपोषण करण्याचा इशाराही यावेळी श्रृंगारपवार यांनी दिला आहे.धरणे आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष दिलीप उत्तरवार, सचिव अजय तुम्मावार, कार्याध्यक्ष आनंद श्रृंगारपवार, मार्गदर्शक डी.सी. गुरूभक्षानी, भूषण समर्थ, अरूण निंबाळकर, गुप्ता, नगराळे, आर. के. संचेती, टी. एन. पाटील, बोमनवार, डी.व्ही. पटेल, प्रमोद चिलवे, मकसूदभाई शेख, महेंद्र ब्राह्मणवाडे तसेच कंत्राटदार संघटनेचे सदस्य प्रविण तामशेट्टीवार, नितीन वायलालवार, नितीन मुलकलवार, रोहित विष्णोई, राहूल निलमवार, ब्रिजोश बेदी, छगन धारापुरे, सिताराम टेंभुर्णे, बंडू शनिवारे, स्वप्नील कायरकर, सुनील डोगरा, नीलकंठ गावंडे, बरकद पठाण, अभिजित कोरडे, राधाकिसन येगलोपवार, अमोल आर्इंचवार, संजय पंदिलवार, बन्सी मेहता, रणछोड कलंत्री, सुनील गभणे आदी कंत्राटदार उपस्थित होते.