ंलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कमी वेळात झटपट कामे व्हावीत, या हेतूने शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी केली आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता पेट्रोलवर चालणाºया वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कच्च्या तेलाचे भाव कमी होऊनही पेट्रोलची दरवाढ सातत्याने होत आहे. १७ सप्टेंबर रोजी रविवारपासून साध्या पेट्रोलचा दर प्रती लिटर ८०.१६ व पॉवर पेट्रोलचा दर प्रती लिटर ८२.८८ रूपये लागू करण्यात आला आहे. पेट्रोलची भरमसाठ दरवाढ झाल्याने सर्वसामान्य व ग्रामीण भागातील वाहनधारक प्रचंड हैराण झाले आहेत.केंद्र शासनाच्या भारतीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारित सर्व पेट्रोल कंपन्या येतात. २०१७ या वर्षात केंद्र शासनाने पेट्रोलच्या भावात अनेकदा वाढ केली आहे. या पेट्रोल दरवाढीविरोधात विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आंदोलने करून शासनाचा निषेध केला होता. मात्र त्यानंतरही केंद्र शासनाची पेट्रोल दरवाढ कायमच आहे. डिझेल, पेट्रोलप्रमाणेच इतर वस्तूंची भाववाढ झाली आहे. यामध्ये किराणा, कापड, खाद्य तेल, तसेच दैनंदिन वापराच्या आणि चैनीच्या वस्तूंचा समावेश आहे.सातत्याने पेट्रोलची दरवाढ होत असल्याने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून नव्याने दुचाकी घेणाºया वाहनधारकांचाही दुचाकीबाबतचा कल बदलला आहे. आता अधिकाधिक एवरेज देणाºया गाड्यांची खरेदी होताना दिसून येत आहे. कमी पेट्रोलमध्ये अधिकाधिक अंतर धावणाºया दुचाकी खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे.दुर्गम भागात पेट्रोलचा भाव प्रती लिटर १०० वरगडचिरोली जिल्ह्यात तालुका मुख्यालयासह काही मोजक्या मोठ्या गावांमध्ये पेट्रोलपंप आहे. तसेच गडचिरोली जिल्हा मुख्यालयी पेट्रोलपंप आहे. मात्र ग्रामीण व दुर्गम भागात पेट्रोलपंप नाही. त्यामुळे ग्रामीण भागात पेट्रोलचे किरकोळ विक्रेते आता लिटरमागे १०० पेक्षा अधिक पैसे घेत आहेत. ग्रामीण भागातील काही दुकानदार ११०, १२० तर काही दुकानदार १२५ रूपये लिटर मागे घेत आहे. ग्रामीण भागात पेट्रोल मिळत नसल्याने वाहनधारकांना पेट्रोल दरवाढीचा फटका सातत्याने सहन करावा लागत आहे.दररोज होत आहे वाढगडचिरोली शहरातील एका पेट्रोलपंपावर दरवाढीबाबत विचारणा केली असता, गेल्या काही दिवसांपासून आता दररोज पेट्रोलच्या भावात पाच ते दहा पैशांची वाढ होत असल्याची माहिती पेट्रोलपंपावरील कामगारांनी दिली. सध्या साधा पेट्रोल ८०.१६ व पॉवरचा पेट्रोल प्रती लिटर ८२.८८ रूपये भावाने विकला जात असल्याचे सांगितले.
पेट्रोलच्या दरवाढीने वाहनधारक प्रचंड हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:03 PM
कमी वेळात झटपट कामे व्हावीत, या हेतूने शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी केली आहेत.
ठळक मुद्देसरकारवर रोष : ग्रामीण भागातील वाहनधारकांना फटका