गडचिराेली जिल्ह्यात आराेग्याची संपूर्ण मदार शासकीय आराेग्य यंत्रणेवर अवलंबून आहे; मात्र आराेग्य विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. विशेष करून एमबीबीएस डाॅक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. दुर्गम भागात हे डाॅक्टर सेवा देण्यास तयार हाेत नाही. प्रशासनामार्फत प्रयत्न करूनही डाॅक्टरांची पदे रिक्त राहतात. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५ एमबीबीएस व ३२ बीएएमएस डाॅक्टरांना काेराेना केवळ कालावधीपर्यंत कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आले हाेते. हेच डाॅक्टर आता सेवेत कायम हाेण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दुर्गम भागातील नागरिकांना सेवा मिळण्यास मदत हाेईल.
बाॅक्स
पहिल्यांदाच सर्व जण झाले रूजू
गडचिराेली जिल्ह्यातील दुर्गम भागात एमबीबीएस डाॅक्टर सेवा देण्यास तयार हाेत नाही. या डाॅक्टरांना नियुक्तीपत्र दिल्यानंतर ते रूजू हाेत नाहीत किंवा काही दिवसांची सेवा दिल्यानंतर नाेकरी साेडतात; मात्र काेराेना काळात नियुक्ती देण्यात आलेले सर्वच डाॅक्टर रूजू झाले व अजूनही सेवा देत आहेत, ही समाधानाची बाब आहे.
काेट
गडचिराेली जिल्ह्यात डाॅक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे काेराेनाकाळात कंत्राटी तत्त्वावर नेमलेल्या डाॅक्टरांना कायम केले जाण्याची शक्यता आहे. काेराेना काळात नेमलेल्या डाॅक्टरांनी उत्तम प्रकारची सेवा दिली आहे.
-कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिराेली.
काेट
काेराेनाचे काम जीवावर बेतणारे हाेते. अशाही कालाधीत आपण सेवा दिली आहे. त्यामुळे सेवेत कायम करावे, अशी अपेक्षा आहे. शासन काेणता निर्णय घेते, याची प्रतीक्षा आहे. सेवेत कायम झाल्यास चांगलेच हाेईल. पुन्हा रुग्णांची सेवा करण्याची संधी उपलब्ध हाेईल.
-बीएएमएस डाॅक्टर
आलेख
बीएएमएस डाॅक्टरांना नियुक्तीपत्र-५
एमबीबीएस डाॅक्टर रूजू -५
बीएएमएस डाॅक्टरांना नियुक्तीपत्र-३२
बीएएमएस डाॅक्टर रूजू-३२