लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील महिला व बाल रूग्णालयात लिफ्ट बसविण्यात आली आहे. मात्र या लिफ्टला ग्रिल (लोखंडी कठडे) नाही. त्यामुळे सदर लिफ्ट एखाद्या बालकासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर सदर लिफ्ट केवळ रूग्णांसाठी असली तरी या लिफ्टचा वापर आरोग्य कर्मचारी, रूग्णांचे नातेवाईक करीत आहेत.गंभीर स्थितीतील रूग्णाला पहिल्या, दुसऱ्या मजल्यावर नेण्यासाठी महिला व बाल रूग्णालयात लिफ्ट बसविण्यात आली आहे. या लिफ्टला बाहेरून लोखंडी कठडे लावण्यात आले नाही. लिफ्टचा दरवाजा उघडण्याची बटन एखाद्या मुलाचा सहज हात पुरेल एवढ्या अंतरावर आहे. एखाद्या मुलाने बटन सुरू केल्यानंतर लिफ्टचा दरवाजा आपोआप खुला होता. चार ते पाच वर्षाच्या मुलाने कुतूहल म्हणून लिफ्टमध्ये प्रवेश केल्यानंतर काही वेळात दरवाजा आपोआप बंद होतो. त्यानंतर मात्र लिफ्टचा वापर कशा पध्दतीने करावा, हे ग्रामीण भागातील मुलाला माहित राहत नाही. त्यामुळे सदर मुलगा लिफ्टमध्येच काही काळ अडकून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास मोठा धोका होऊ शकतो. सदर लिफ्ट केवळ रूग्णांसाठीच वापरायची आहे. याबाबतच्या स्पष्ट सूचना दोन्ही लिफ्टच्या वरच्या बाजूला लिहिण्यात आल्या आहेत. मात्र लिफ्ट खुली असल्याने रूग्णालयात येणारे रूग्णांचे नातेवाईक, आरोग्य कर्मचारी दिवसभर या लिफ्टचा वापर करतात. काही नागरिक तर कुतूहलापोटी आपल्यासोबत आलेल्या मुलांना बसवून लिफ्टचा वापर करतात. हा दुरूपयोग टाळण्यासाठी ग्रिल बसविणे आवश्यक आहे. एकदा बंद पडल्यानंतर ती वस्तू दुरूस्त न करण्याचे सरकारी धोरण आहे. याचा फटका जिल्हा रूग्णालयातील लिफ्टला बसला असून सदर लिफ्ट बंद आहे.
महिला रूग्णालयातील लिफ्ट ग्रिलअभावी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:00 AM
स्थानिक इंदिरा गांधी चौकातील महिला व बाल रूग्णालयात लिफ्ट बसविण्यात आली आहे. मात्र या लिफ्टला ग्रिल (लोखंडी कठडे) नाही. त्यामुळे सदर लिफ्ट एखाद्या बालकासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठळक मुद्देकठडे बसवा : आरोग्य कर्मचारी व नागरिकांकडून दिवसभर वापर