लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : मागील आठवडाभरापासून पावसाने उसंत घेतल्याने शेतकरी पेरणीपूर्व कामे आटोपून धानपेरणीच्या कामाला लागला आहे. विशेष म्हणजे सध्या तूर, तीळ आदी आंतरपिकासाठी पाळ्यांवर माती टाकण्याचे काम सद्या जोमात सुरू आहे. त्यामुळे शेतकरी शेतात व्यस्त दिसून येत आहे.अनेक शेतकऱ्यांनी धान पेरणी केलेल्या शेतातील पऱ्ह्यांना वाचविण्यासाठी उपलब्ध जलसाठ्यातून मोटर पंप, डिझेल इंजिन यांच्या मदतीने पाणी पुरवठा करण्याची धडपड शेतकरी करतोय. दुसरीकडे पेरणीपूर्व मशागत आणि शक्य असल्यास पेरणी करताना बळीराजा दिसत आहे.चालू आठवड्याच्या सुरुवातीला पावसाची दमदार एंट्री झाली. त्यामुळे जमिनीत ओलसरपणा तयार झाला. पाऊस येण्यापूर्वीच ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व मशागत पूर्ण करून पेरणी केली होती. त्यांना या पावसाचा फायदा झाला खरा परंतु मंगळवारनंतर पाच दिवस होऊनही पाऊस न पडल्यामुळे आणि उन्हाच्या तीव्रतेने धान पेरलेल्या बांधीमधील ओलावा निघून गेला परिणामी धान पऱ्ह्यांना आजघडीला पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी बळीराजा शक्य त्या सोईने शेताजवळच्या जलसााठ्यातून मोटर पंप, डिझेल इंजिन यांच्या सहाय्याने पाणी पुरवठा करीत आहे.विसोरा परिसरात खरीप धान पेरणीला सुरुवात झाली आहे. पण बहुतांश शेतकरी अजूनही चांगल्या पावसाची वाट पाहत आहे. आत शेतजमीन नांगरणीसाठी योग्य झाल्याने पेरणीपूर्व धान पीक हंगामाची कामे पूर्ण करण्यात व्यस्त आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धानपीक हे प्रमुख पीक आहे. असे असले तरी येथील शेतकरी आपल्या शेतातील बांधावर तूर, तीळ तसेच वेलवर्गीय भाजीपाला वनस्पती यांची लागवड करून आंतरपीक घेतात. याकरिता बांधीमधील माती धूऱ्यांवर टाकण्याचे काम सुरू आहे.
धान पेरणी व मशागतीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:09 AM
मागील आठवडाभरापासून पावसाने उसंत घेतल्याने शेतकरी पेरणीपूर्व कामे आटोपून धानपेरणीच्या कामाला लागला आहे. विशेष म्हणजे सध्या तूर, तीळ आदी आंतरपिकासाठी पाळ्यांवर माती टाकण्याचे काम सद्या जोमात सुरू आहे.
ठळक मुद्देआंतरपीक मशागतही सुरू : जिल्हाभरातील शेतकरी लागला खरीप हंगामाच्या कामाला