शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आॅनलाईन अर्जांना ‘मंत्रा’चा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:13 AM

मागील चार दिवसांपासून कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देशेतकºयांची ओळख पटविण्यास अडचण : ४२७ संयंत्रांची मागणी, पुरवठा मात्र झालाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील चार दिवसांपासून कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. ज्या शेतकºयांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकासोबत लिंक नाहीत. अशा शेतकºयांची अंगठ्याच्या सहाय्याने ओळख पटविण्यासाठी मंत्रा थम्ब डिव्हाईस असणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे सुमारे ४२७ मंत्रा डिव्हाईसची मागणी केली आहे. मात्र सदर डिव्हाईस उपलब्ध न झाल्याने बहुतांश केंद्रावरील काम ठप्प आहे. त्यामुळे आलेल्या शेतकºयांना परत जावे लागत आहे.कर्जमाफीच्या योजनेचा दुरूपयोग होऊ नये यासाठी प्रत्येक शेतकºयाची ओळख पटविण्यासाठी शासनाने त्यांना कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. आॅनलाईन अर्ज सादर करताना संबंधित शेतकºयाचा आधार कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. आधार कार्डशिवाय पुढची प्रक्रियाच पूर्ण होत नाही. संबंधित शेतकºयाने भरून आणलेल्या अर्जाची माहिती आॅनलाईन टाकली जाते. आॅनलाईन अर्ज सबमिट करण्याच्या पूर्वी ओटीपी (वन टाईम पासवर्ड) क्रमांक विचारला जातो. यातील महत्त्वाची अडचण म्हणजे, आधार कार्ड ज्या मोबाईल क्रमांकासोबत लिंक केला आहे. त्याच क्रमांकावर ओटीपी नंबर उपलब्ध होतो. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांचे आधार कार्डासोबत मोबाईल क्रमांक लिंक नाही. त्यामुळे त्यांना ओटीपी क्रमांक मिळत नाही. अशा शेतकºयांसाठी ‘मंत्रा’ डिव्हाईसच्या माध्यमातून ओळख पटविली जाते. मात्र मंत्रा डिव्हाईस जिल्ह्यातील फार मोजक्या महाआॅनलाईन केंद्र चालकांकडे उपलब्ध आहे. एकूण प्राप्त होणाºया अर्जांपैकी जवळपास ७० टक्के शेतकºयांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकासोबत लिंक नाही. त्यामुळे संबंधित शेतकºयांचे अर्ज प्रलंबित ठेवले जात आहेत किंवा आॅनलाईन नोंदणीच्या कामाला सुरूवात होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला असला तरी, पाच टक्केही अर्ज भरून झाले नाही. ‘आपले सरकार’ या पोर्टलवर अर्ज भरायचे आहेत. राज्यभरात या पोर्टलवर एकाचवेळी काम सुरू झाल्याने सदर पोर्टल बºयाच वेळा काम करीत नसल्याचे दिसून येत आहे.गडचिरोली : गडचिरोली शहरात एकूण ११ महाआॅनलाईन केंद्र आहेत. मात्र यातील काही केंद्र चालकांकडे मंत्रा डिव्हाईस उपलब्ध नाही. नगर परिषदेच्या बाजुच्या इमारतीमध्ये असलेल्या केंद्रात सदर डिव्हाईस उपलब्ध नाही. शेतकºयांना मोफत अर्ज भरून देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे शासनानेच आपल्याला मंत्रा डिव्हाईस उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शादाब शेख यांनी व्यक्त केली आहे. पोटेगाव मार्गावरील केंद्र चालकाकडे मंत्रा डिव्हाईस उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांचे काम व्यवस्थित सुरू आहे, अशी माहिती केंद्राचे संचालक जाकीर हुसैन यांनी दिली आहे.चामोर्शी : चामोर्शी येथील श्री साई कॉम्प्युटर, सेतू केंद्रात १ आॅगस्टपर्यंत ११८ शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरले आहेत. दास महाआॅनलाईन सेतू सेवा केंद्रात ५० शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. आॅनलाईन अर्ज भरताना येणाºया अडचणींबाबत विचारले असता, आमच्याकडे थम्ब डिव्हाईस नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांची कामे होत नाही. ज्या शेतकºयांचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केले आहेत. त्यांच्याकडून अर्ज भरले जात आहेत. लिंक फेलची समस्या काही प्रमाणात आहे. सध्या रोवणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे सेतू केंद्रात पाहिजे तेवढी गर्दी नाही. दोन्ही सेतू केंद्रात शेतकºयांचे अर्ज मोफत भरून दिले जात आहेत. शासनाने मंत्रा थम्ब डिव्हाईस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी श्री साई कॉम्प्युटर सेतू केंद्राचे शंकर पिपरे, खोजेंद्र उंदीरवाडे, मनोज साखरे, दास आॅनलाईन सेतू केंद्राचे शंकर दास, विकास दुधबावरे, प्रविण उंदीरवाडे यांनी केली आहे.देसाईगंज : देसाईगंज तालुक्यात एकूण १७ महाआॅनलाईन केंद्र आहेत. त्यापैकी फक्त सातच केंद्र सुरू आहेत. अर्ज भरण्यासाठी बँकेने माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र बँक व्यवस्थापक ही माहिती देण्यास सहकार्य करीत नसल्याची व्यथा सावंगी येथील शेतकरी घनश्याम नक्टू पेलने यांनी मांडली. देसाईगंज तालुक्यातीलही अनेक केंद्र चालकांकडे मंत्रा थम्ब मशीन उपलब्ध नाही.अहेरी : आॅनलाईन अर्ज भरताना अनेक अडचणी येत होत्या. मंगळवारी दुपारी ३ वाजेपासून नवीन व्हर्जन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे अर्ज भरण्यातील अडचण दूर होईल, अशी आशा आहे. अहेरीच्या दानशूर चौकातील कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये १० अर्ज भरून झाले आहेत, अशी माहिती केंद्र चालक सुदामा हलदर यांनी दिली आहे.आरमोरी : ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या आशेने अर्ज भरण्यासाठी शहरात येत आहेत. मात्र येथील चालकांकडेही थम्ब डिव्हाईस नाही. शहरामध्ये 3एकूण सहा आपले सरकार केंद्र आहेत. मात्र डिव्हाईस नसल्याने ते वापस जात आहेत, अशी माहिती केंद्र चालक नितेश नारदेलवार व पराग हजारे यांनी दिली आहे. विजय सुपारे यांच्या मालकीच्या टेक्नोमीडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्युटमध्ये मात्र मंत्रा डिव्हाईस उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांचे काम व्यवस्थित सुरू आहे.कुरखेडा : ३१ जुलैपर्यंत आपले सरकार सर्वर अतिशय डाऊन असल्याने अर्ज भरण्यास उशीर होत आहे. परिणामी शेतकºयांची केंद्रात गर्दी वाढत होती. १ आॅगस्टपासून मात्र सदर सर्वर थोडेफार व्यवस्थित सुरू आहे. एकूण ३०२ अर्जांपैकी १०२ अर्ज अपडेट करण्यात आले आहेत. सर्व अर्ज स्वीकारून त्यांना पुढील तारखेला पाचारण करण्यात येत असल्याची माहिती क्रिस्टल कॉम्प्युटर येथील केंद्र संचालक शाहीद हाशमी यांनी दिली आहे.