अडीच ते पाच किलोंचे दप्तर : शासन निर्णयाच्या अंमलबजावणीत प्रशासन नापास! गडचिरोली : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी अद्यापही गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात वेगाने सुरू झालेली नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने रिअॅलिटी चेक म्हणून काही इंग्रजी शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर करून पाहिल्यावर लक्षात आले आहे. आजही विद्यार्थ्याच्या खाद्यांवर किमान अडीच ते पाच किलो दप्तराचे ओझे असल्याचे दिसून आले आहे. मात्र शिक्षण विभागाने शाळांना माहिती देऊन यावर उपाययोजना करण्याबाबत सूचविले आहे. काही शाळांनीही पालकांना दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत आवाहन करणारे पत्रही लिहिले आहे.
चिमुकल्यांच्या खांद्यावर दप्तराचे ओझे
By admin | Published: December 31, 2015 1:23 AM