चामोर्शी शहरातील गावतलावाचा दरवर्षी लिलाव केला जातो. लिलावानंतर तलावाची मालकी प्राप्त झालेल्या मत्स्य सहकारी संस्था तसेच नागरिक पावसाळ्यात मत्स्यबीज टाकतात. साधारणत: दिवाळी व संक्रांतीनंतर या मत्स्यबीजाची बऱ्यापैकी वाढ होते. यंदाही चामोर्शीच्या गावतलावात मासोळ्यांचे प्रमाण चांगले आहे व वाढही बरीच झाली आहे. मात्र या तलावाला जलपर्णी (इकाॅर्निया) वनस्पतीने विळखा घातल्याने मासेमार बांधवांना मासे पकडण्यासाठी तलावात योग्य प्रकारे जाळे टाकता येत नाही. त्यामुळे शहरातील मासेमार बांधव त्रस्त झाले आहेत. सध्या या तलावात संपूर्ण क्षेत्रात जलपर्णी वनस्पती वाढली असल्याने संपूर्ण तलाव हिरवागार दिसून येत आहे. संबंधित विभागाने या तलावातील गाळाचा पूर्णत: उपसा करून जलपर्णी वनस्पतीची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. अशा प्रकारची मागणीही शहरातील केवट, ढिवर व भोई समाजबांधवांकडून सातत्याने होत आहे.
इकाॅर्नियामुळे तलावातील जल साठवणुकीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:23 AM