शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
4
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
5
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
6
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
7
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
10
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
11
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
12
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
13
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
14
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
15
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
16
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
17
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
18
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
19
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
20
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान

ग्रामीण रुग्णालयातील ईसीजी मशीन बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:38 AM

देसाईगंज शहरात आरोग्य सुविधा पाहिजे त्याप्रमाणात उपलब्ध नसल्याने लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी या ठिकाणीच सर्वच आरोग्यविषयक कामासाठी जावे लागते. ...

देसाईगंज शहरात आरोग्य सुविधा पाहिजे त्याप्रमाणात उपलब्ध नसल्याने लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी या ठिकाणीच सर्वच आरोग्यविषयक कामासाठी जावे लागते. तालुक्यातील ही निकड लक्षात घेऊन स्थानिक पदाधिकारी, आमदार यांचे शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याने ग्रामीण रुग्णालय, देसाईगंज या ठिकाणी ईसीजी, सोनोग्राफी, एक्स-रे मशीन यासारख्या सुविधा पुरविण्यात आल्या. जेणेकरून तालुक्यातील तसेच इतरही ठिकाणच्या नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा या कमी खर्चात उपलब्ध होऊन दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन उपचार करून घेणे व सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड पडू नये, हा दृष्टिकोन ठेवून या यंत्राची उपलब्धता येथील ग्रामीण रुग्णालयात करून देण्यात आली. परंतु आजमितीस सोनोग्राफी, ई.सी.जी मशीन हाताळण्यासाठी लागणारे अहर्ताधारक तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने या मशीन धूळखात पडलेल्या आहेत. येथील सोनोग्राफी मशीन हाताळण्यासाठी खासगी सोनोग्राफी चालविणाऱ्या डाॅक्टरांना पाचारण करून आठवड्यातील एक वा दोन दिवस काहीच वेळ देऊन सोनोग्राफीचे कामे उरकली जात आहेत. ईसीजी, सोनोग्राफी, एक्स-रे मशीन हाताळण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ वरील यंत्रसामग्री हाताळण्यासाठी लागणारे अर्हताधारक टेक्निशियन किंवा डाॅक्टर यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.