बाॅक्स
एसटीचे १५ टक्केच शेड्यूल्ड सुटले
लाॅकडाऊन असल्याने प्रवासी मिळणार नाही. असा अंदाज बांधून एसटी प्रशासनाने बसचेे शेड्यूल्ड कमी करण्याच्या दृष्टीने अगाेदरच नियाेजन केले हाेते. ग्रामीण भागातील संपूर्ण बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. चंद्रपूर, नागपूर, अहेरी मार्गावर काही बसफेऱ्या साेडण्यात आल्या. चंद्रपूरला जाणारे बरेच प्रवासी मिळाल्याने चंद्रपूरसाठी काही बसफेऱ्या साेडल्या. ग्रामीण भागातील काही प्रवासी बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत हाेते. मात्र ग्रामीण भागातील मार्गांवर बसफेऱ्या साेडण्यात आल्या नाहीत. तसेच खासगी वाहतूकही बंद असल्याने या प्रवाशांची चांगलीच गाेची झाली.
मार्कंडात प्रतिसाद
मार्कडादेव : चामोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र मार्कडादेव येथील स्थानिक दुकानदारानी वीकेंड लाॅकडाऊनला प्रतिसाद देत संपूर्ण दुकाने बंद ठेवली. परिसरातील काही गावांमध्येही लाॅकडाऊनचे पालन करण्यात आले.
जाेगीसाखरा परिसरात लाॅकडाऊनला प्रतिसाद
जोगिसखरा: परिसरातील जोगीसाखरासह पळसगाव, पातरगोटा, शंकरनगर, सालमारा, आष्टा, रामपूर या गावात बंद संदर्भात दवंडी देण्यात आली. सरपंच, उपसरपंच, सदस्य, सचिवांच्या पुढाकाराने गावातील बैठक घेऊन शनिवार रविवार दुकाने तसेच इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी स्वत रस्त्यावर फिरण्यावरसुद्धा निर्बंध घातल्याने गावातील रस्ते निर्मनुष्य झाले हाेते.