लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा चांगला पर्याय आहे. दुग्ध संकलन व्यवसायातून कुटुंबाची आर्थिकवृद्धी व विकास शक्य आहे. त्यामुळे महिलांनी या व्यवसायाकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन विभाग गडचिरोलीचे उपायुक्त डॉ.भाऊसाहेब वंजारी यांनी केले.मानव विकास मिशन जिल्हाधिकारी कार्यालय व महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत दुग्ध संकलन केंद्र सहकारी नोंदणीपूर्व एकदिवसीय कार्यशाळा २७ ऑगस्ट रोजी मार्र्कंडादेव येथील सभागृहात घेण्यात आली. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.याप्रसंगी मंचावर माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सचिन यादव, सहकार अधिकारी संजय कळंबे, मानव विकास मिशनचे सहायक मनोहर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दुग्ध संकलन व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.कार्यशाळेला जीवनज्योती लोकसंचालित साधन केंद्र वैरागड, चामोर्शी, आरमोरी येथील संपूर्ण कर्मचारी तसेच शरयू दुग्ध गंगा संकलन केंद्र, संकलन केंद्र मोहझरी, मेंढा, किटाळी, सायगाव येथील महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक कांता मिश्रा, संचालन साधन केंद्राच्या व्यवस्थापक पौर्णिमा खोब्रागडे यांनी केले तर आभार यामिनी मातेरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विद्या मेश्राम, अस्मिता खोब्रागडे, रूंदा शहारे, अंजली हेमके, डिम्पल ढोरे, माया खोब्रागडे, भारती नांदगावे, प्रेमिला वाकुडकर आदींनी सहकार्य केले.
दूध संकलन व्यवसायातून आर्थिक वृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 11:37 PM
मानव विकास मिशन जिल्हाधिकारी कार्यालय व महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत दुग्ध संकलन केंद्र सहकारी नोंदणीपूर्व एकदिवसीय कार्यशाळा २७ ऑगस्ट रोजी मार्र्कंडादेव येथील सभागृहात घेण्यात आली. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
ठळक मुद्देमान्यवरांचे प्रतिपादन : माविमतर्फे मार्र्कंडादेव येथे सहकार नोंदणीपूर्व कार्यशाळा