सदर निवेदनानुसार, गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी गावागावांतील संघटना व महिलांनी प्रभावीरीत्या लागू केली आहे. ती अजून मजबूत करण्यासाठी प्रयत्न करून गाव दारूमुक्त ठेवण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवून गडचिरोली जिल्ह्यातील प्रभावी दारूबंदीला धोका निर्माण करण्याचे काम केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्याचा लाभ फक्त मूठभर दारूविक्रेत्यांनाच झाला आहे. यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील व्यसनाधीनतेच्या प्रमाणात वाढ होणार आहे. ऐतिहासिक दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात बेकायदा अवैध दारू येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यावर येणारे संकट टाळण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील ११४ गावांनी मुख्यमंत्र्यांना हाक दिली आहे. या गावांनी ठराव घेत निषेध नोंदविला आहे. यासंदर्भातील निवेदन तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी स्वीकारले.
080721\08gad_3_08072021_30.jpg
तहसीलदार प्रदीप शेवाळे यांना निवेदन देताना गाव संघटनांच्या महिला.