अहेरी येथील केंद्र शाळेच्या सभागृहात उपस्थित मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांना ते मार्गदर्शन करीत हाेते. याप्रसंगी डायटच्या अधिव्याख्याता वैशाली येगोलपवार उपस्थित हाेत्या. येगाेलपवार यांनी सेतू अभ्यासक्रमाची ओळख व यात शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डायचे विषय सहायक विठ्ठल होंडे यांनी सेतू अभ्यासक्रमाचे मूल्यमापन व नोंद याबाबत माहिती दिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गटसन्मवयक तथा केंद्रप्रमुख प्रफुल्ल मंडल यांनीही मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळा दोन सत्रात घेण्यात आली. प्रत्येकी सहा याप्रमाणे बाराही केंद्रातील केंद्र प्रमुखांसह शंभरवर मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक विषयतज्ज्ञ किशोर मेश्राम, संचालन साधन व्यक्ती सुषमा खराबे तर आभार साधन व्यक्ती ताराचंद भुरसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साधन व्यक्ती अरुण जक्काेजवार, राजू नागरे, ज्ञानेश्वर कापगते, दीपा रामटेके, प्रवीणा कांबळे व राजेश चक्रमवार यांनी सहकार्य केले.
290721\img-20210729-wa0100.jpg
सेतु अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा...प्राचार्य शरदचंद्र पाटील