स्थलांतरित व शाळाबाह्य : नागपूर व मध्य प्रदेशातील मुलंगडचिरोली : जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांच्या पथकाने गडचिरोली शहरात रोजगारासाठी जिल्हा व महाराष्ट्राबाहेरून आलेल्या कुटुंबाचे सर्वेक्षण करून या कुटुंबातील आठ स्थलांतरीत शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधून काढले व या विद्यार्थ्यांना शुक्रवारी स्थानिक राजीव गांधी नगर परिषद प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांच्या समावेत गडचिरोली पं.स.चे गट शिक्षणाधिकारी उद्धव डांगे, शिक्षण विस्तार अधिकारी संगिता खोब्रागडे, केंद्र प्रमुख राजू वडपल्लीवार, सय्यद, राधेश्याम भोयर उपस्थित होते. शाळेत दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये बिरजू कमलसिंग सयाम (९) इयत्ता तिसरी, कोरवती कमलसिंग सयाम (७) इयत्ता दुसरी, प्रकाश विजयसिंग मरकाम (११) इयत्ता पाचवी, आरती कमलसिंग सयाम (११) इयत्ता पाचवी, सुनीता कमल राठौर (६) इयत्ता पहिली, दिव्या सरदारसिंग राठौर (६) इयत्ता पहिली, संजू सरदारसिंग राठौर (८) इयत्ता तिसरी व सुमनबाई लक्ष्मण चव्हाण (७) इयत्ता दुसरी यांचा समावेश आहे. ही मुले, मुली नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील हेटीटोला व मध्य प्रदेशातील बेगम येथील रहिवासी असून त्यांचे कुटुंबीय लोखंडी वस्तू बनविण्याच्या कामासाठी गडचिरोली शहरात दाखल झाले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
आठ मुले, मुली शाळेत दाखल
By admin | Published: February 29, 2016 1:05 AM