या शेतात निंदणाचे व पाळ्यावरील गवत कापण्याचे काम सिंधुबाई अशोक लटारे करीत होत्या. त्यांना रोवणी केलेल्या बांधित काहीतरी असल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी उभे राहून बारकाईने चाहुल घेतली असता मोठी मगर दिसली. त्यामुळे सिंधुबाई घाबरून गेल्या. त्यांनी लगेच पती व मुलांना बोलावून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी शेतात पाहणी केली असता मोठ्या आकाराची मगर दिसून आली. यानंतर सर्पमित्रांना आणि वन विभागाला फोनवरून माहिती दिल्यानंतरही शेतात बघ्यांची गर्दी जमली.
वनपरिश्रेत्र अधिकारी प्रवीण लेले यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक एम. पी. मुनघाटे, वनरक्षक आनंद साखरे, शरद उराडे, विठ्ठल मेश्राम, सर्पमित्र राकेश सोमनकर, प्रथम कोत्तावार, अभिषेक कोत्तावार आणि मार्कंडपुरातील युवकांनी मगरीस पकडण्यासाठी पुढाकार घेतला.
(बॉक्स)
मगर नेमकी आली कुठून?
अंदाजे एक क्विंटल वजनाची ती मगर शेताजवळ असलेल्या नाल्यातून आल्याचा अंदाज बांधला जात आहे. गेल्या वर्षी चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा परिसरात मगरीचे एक पिल्लू आढळले होते. तसेच गेल्या वर्षी चामोर्शी शहरातील गावतलावात मगरीचे अस्तित्व आढळले होते. ही मगर तीच की अजून दुसरी मगर आली? याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. वैनगंगा नदीतील पाण्यातून मगर नाल्यातील पाण्यात आली असण्याचाही अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.
(बॉक्स)
वैनगंगा नदीपात्रात सोडले
चामोर्शी - मूल रस्त्यावरील हरणघाट नाक्याला लागून असलेल्या वैनगंगा नदीत त्या मगरीला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोडून जीवनदान दिले. यावेळी त्या मगरीला पाहण्यासाठी चामोर्शी आणि शंकरपूर हेटी येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
310821\img_20210831_155950.jpg
पकडण्यात आलेले मादी जातीचे मगर फोटो