शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

वेलगूर फाट्यावर आठ तास चक्काजाम; वाहतूक ठप्प

By admin | Published: September 15, 2016 1:52 AM

तालुक्यातील विविध मूलभूत समस्या तत्काळ मार्गी लावाव्यात, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांच्या नेतृत्वात वेलगूर, बोटलाचेरू,

हजारो नागरिक रस्त्यावर : बबलू हकीम यांनी केली एसडीओंशी चर्चाअहेरी : तालुक्यातील विविध मूलभूत समस्या तत्काळ मार्गी लावाव्यात, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांच्या नेतृत्वात वेलगूर, बोटलाचेरू, नवेगाव, वेलगूर टोला व किष्टापूर येथील हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून बुधवारी आलापल्ली-मुलचेरा मार्गावरील वेलगूर बायपास फाट्यावर तब्बल आठ तास चक्काजाम आंदोलन केले. यामुळे मुलचेरा-आलापल्ली, वेलगूर-किष्टापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.अहेरी तालुक्यातील विविध समस्यांसंदर्भात प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही समस्या सोडविण्यात आल्या नाही. त्यामुळे त्रस्त झालेले हजारो नागरिक, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांच्या नेतृत्वात बुधवारी पहाटे ४.३० वाजता वेलगूर फाट्यावर गोळा झाले. येथे पहाटे ५ वाजतापासून दुपारी १ वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळताच अहेरीचे उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती, नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी लागलीच आंदोलनस्थळ गाठले. यावेळी आंदोलनकर्त्या नागरिकांनी उपविभागीय अधिकारी राममूर्ती यांना रस्त्याची दुरवस्था दाखविली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अहेरी येथील उपविभागीय अभियंता मडावी, संवर्ग विकास अधिकारी सुनील तडस, अभियंता चिंतावार, गंपावार यांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावली. १६ सप्टेंबर रोजी सर्व विभाग प्रमुखांशी आपण चर्चा करून वेलगूर परिसरातील रस्ता दुरूस्तीचे काम सुरू करून इतर समस्या मार्गी लावू, असे आश्वासन उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश साळुंखे, चांगदेव कोळेकर, छाया तांबुसकर व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मध्यस्तीने नागरिकांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. याप्रसंगी मुश्ताक हकीम, राजेश्वर उत्तरवार, पं. स. सदस्य आत्माराम गद्देकार, वेलगूरचे ग्रा. पं. सदस्य आदिल पठाण, इरफान पठाण, जि. प. सदस्य विजया विठ्ठलानी, लैजा चालुरकर, सलिम शेख, पुष्पा अलोणे, नागेश कर्मे, वेलगूरच्या सरपंच कुसूम दुधी, किष्टापूरच्या सरपंच अंजना पेंदाम, तंमुस अध्यक्ष रवींद्र उरेते, नागो कस्तुरे, लिंगा गोेलेटी, तुकाराम झोळे, विलास शेंडे, हरिचंद्र पोटरंगे, दिलीप दुर्गे, दीपक चुनारकर, श्यामराव कुमरे, देवराव माडावार, रवी गावतुरे, अरविंद खोब्रागडे, ऋषी सडमेक आदी उपस्थित होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चक्काजाम आंदोलनामुळे तब्बल आठ तास वाहतूक ठप्प झाल्याने आलापल्ली-मुलचेरा मार्गावर दोन्ही बाजुस शेकडो वाहनांची रांग लागली होती. वेलगूर भागातील समस्या मार्गी न लागल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्या नागरिकांनी प्रशासनाला यावेळी दिला. (प्रतिनिधी)