लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात उज्वला योजनेअंतर्गत दोन वर्षात ५७ हजार २३ कुटुंबांमध्ये गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. आता १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार आहे. त्यात जिल्ह्याच्या दुर्गम भागातील ८ गावांमध्ये १०० टक्के गॅस कनेक्शन देऊन ही गावे चूलविरहित केली जातील, अशी माहिती तेल कंपन्यांचे गडचिरोली जिल्ह्याचे नोडल आॅफिसर आशिषकुमार यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.२० एप्रिल हा दिवस उज्वला दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त जिल्ह्यात १६ ठिकाणी एलपीजी पंचायतचे आयोजन केले जाणार आहे. त्यात गॅस वापराच्या सुरक्षेसंबंधीच्या माहितीसोबत महिलांचे आरोग्य व इतर बाबींवर मार्गदर्शन केले जाईल, असे आशिषकुमार यांनी सांगितले. याशिवाय ५०० नवीन ग्राहकांची नोंदणी करून १०० जणांना त्याच दिवशी गॅस वाटप होणार असल्याचे देसाईगंजचे हिंदुस्थान पेट्रोलियमचे मुख्य वितरक मनिष समर्थ यांनी सांगितले.ग्रामस्वराज्य अभियानात समावेश केलेल्या ८ गावांमध्ये मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक, अहेरी तालुक्यातील महागाव बु., प्यारेपल्ली, छल्लेवाडा व गोविंदगाव तसेच सिरोंचा तालुक्यातील जफराबाद चक, गुमलकोंडा व ताडीकोंडा या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या २ लाख ५१ हजार कुटुंबांपैकी ७६ टक्के कुटुंबांमध्ये एलपीजी गॅस कनेक्शन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. १ एप्रिलपासून सुरू झालेल्या विस्तारित उज्वला योजनेत समावेश केलेल्या नवीन प्रवर्गांची माहितीही पत्रपरिषदेत दिली.
आठ गावे चूलविरहित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 1:20 AM
जिल्ह्यात उज्वला योजनेअंतर्गत दोन वर्षात ५७ हजार २३ कुटुंबांमध्ये गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. आता १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार आहे. त्यात जिल्ह्याच्या दुर्गम भागातील ८ गावांमध्ये १०० टक्के गॅस कनेक्शन देऊन ही गावे चूलविरहित केली जातील,.....
ठळक मुद्देग्रामस्वराज्य अभियान : ‘उज्वला’ योजनेतून ५७ हजार कुटुंबांना गॅस