लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी रविवारी (दि.१५) राज्याचे ज्येष्ठ मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन त्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप केले. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल प्रामुख्याने उपस्थित होते.ना.शिंदे यांनी सकाळी मुंबईवरून नागपूर गाठले. त्यानंतर हेलिकॉप्टरने दुपारी १ ते गडचिरोलीत दाखल झाले. नक्षलविरोधी अभियानासाठी सदैव सज्ज राहणाऱ्या पोलीस दलाच्या सी-६० पथकातील जवानांना त्यांनी मिठाईचे वाटप करत दिवळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर हेलिकॉप्टरने अहेरी तालुक्यातील येलचिल येथे असलेल्या पोलीस मदत केंद्राला भेट देऊन तेथील जवळपास ७० जवान व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांना मिठाई वाटप करून विपरित परिस्थितीत ते कर्तव्य बजावत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या जवानांच्या सुविधांसाठी शासनस्तरावरून निधी मंजूर करून आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.गृहमंत्र्यांनीही साधला संवाददरम्यान शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हेलिकॉप्टरने सिरोंचा तालुक्यातील पातागुडम येथे असलेल्या पोलीस मदत केंद्राला भेट देऊन पोलीस जवान व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांना मिठाईचे वाटप केले. यावेळी जवानांनी त्यांना भेडसावणाऱ्या रुग्णालय, निवास यासारख्या समस्या गृहमंत्र्यांना सांगितल्या.
गडचिरोलीत एकनाथ शिंदे यांची पोलीस जवानांसोबत दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 10:28 PM
Gadchiroli News Diwali जिल्ह्याच्या दुर्गम भागात नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी रविवारी (दि.१५) राज्याचे ज्येष्ठ मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन त्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप केले.
ठळक मुद्देदुर्गम भागातील कर्तव्य बजावणाऱ्यांना वाटली मिठाई