शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

नगर पंचायतीची निवडणूक वॉर्ड पध्दतीने होणार

By admin | Published: August 03, 2015 1:08 AM

पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये अस्तित्वात असलेली निवडणुकीची प्रभाग पध्दती बाद करण्यात आली असून जिल्ह्यातील १० नगर पंचायतीच्या निवडणुका वॉर्ड पध्दतीने होणार आहेत.

आखणी सुरू : प्रशासन लागले कामालाकुरखेडा : पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये अस्तित्वात असलेली निवडणुकीची प्रभाग पध्दती बाद करण्यात आली असून जिल्ह्यातील १० नगर पंचायतीच्या निवडणुका वॉर्ड पध्दतीने होणार आहेत. त्यामुळे मतदार संघाचा आकार लहान होऊन उमेदवारांची दमछाक कमी होणार आहे. राज्य शासनाने तालुका मुख्यालयाच्या १० ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान दिला आहे. या १० ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या १० ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. पूर्वी तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीची प्रभाग पध्दती अस्तित्वात होती. त्यावेळी एका प्रभागातून दोन अथवा दोनपेक्षा अधिक सदस्य निवडून येत असत. मात्र जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाच्या १० ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाल्याने येथील निवडणूक प्रभाग पध्दतीऐवजी वार्ड पध्दतीने घेण्याचे शासनाने निश्चित केले आहे व त्या अनुषंगाने शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. प्रत्येक नगर पंचायतीमध्ये वार्ड आखणीचे काम जोमात सुरू आहे. आरमोरी, कोरची, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व आरमोरी या १० ग्रामपंचायतीमध्ये १७ सदस्य राहणार आहेत. प्रत्येक नगर पंचायतीची १७ वार्डांमध्ये विभागणी करण्यात येत आहे.प्रभागऐवजी वार्ड पध्दती अस्तित्वात येत असल्याने मतदारांची संख्या कमी होणार आहे. तसेच भौगोलिक क्षेत्रही कमी होणार आहे. त्यामुळे निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची पूर्वीच्या तुलनेत दमछाक कमी होणार आहे. एका वार्डातून एक सदस्य निवडून येणार असल्याने त्याच्यावरील जबाबदारी निश्चितच वाढणार आहे. निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)