लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून मुंबईत सुरू झालेला सत्तास्थापनेच्या नाट्याचा एक अंक पूर्ण झाला आहे, पण मंत्रिपदासाठी इच्छुक सर्व नेतेमंडळींसाठी महत्वाचा असणारा दुसरा अंक बाकी आहे. याचा फटका जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीला बसला आहे. हिवाळी अधिवेशनानंतर आणि एकदाचे मंत्रिमंडळ विस्ताराचे टेन्शन दूर झाल्यानंतरच नेतमंडळींना जिल्हा परिषदेच्या राजकारणात लक्ष देण्यास वेळ मिळणार आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाकडून अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख नंतरच जाहीर केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या महिन्यात जि.प.अध्यक्षपदासाठी सोडत निघाल्यानंतर आता निवडणुकीची तारीखही लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र मुंबईत सत्तास्थापनेच्या नाट्याने अनेक वळणं घेतली. राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांवर भाजपचे वर्चस्व आहे. असे असले तरी राज्य सरकारप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांनी एकत्र येऊन नवीन समीकरण करत जिल्हा परिषदांमधील सत्ता काबिज करावी काय, याची चाचपणी केली जात आहे. हे करताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि सल्ल्याची गरज आहे. पण नेतेमंडळी मंत्रिमंडळातील आपले स्थान पक्के होईपर्यंत मुंबईतून हलायला तयार नाही. संपूर्ण राज्यभरातच ही स्थिती असल्याने ग्रामविकास विभागाने या निवडणुकीची अंतिम तारीख जाहीर केलेली नाही. परिणाम विद्यमान पदाधिकाऱ्यांना तेवढाच जास्त काळ पदावर बसायला मिळत असल्यामुळे ते खुश दिसत आहेत.काँग्रेसला सत्तेत वाटेकरी न केल्यास पुन्हा भाजपला अध्यक्षपदाची संधी मिळेल. परंतू दुसºया विद्यमान अध्यक्षांना पुन्हा संधी मिळणार नसल्याचे सांगितले जाते.सर्वांचीच नजर अध्यक्षपदाच्या खुर्चीवरगडचिरोली जिल्हा परिषदेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदिवासी विद्यार्थी संघ यांनी मिळून अडीच वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली. आता अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने सर्वच पक्षातील दिग्गज सदस्य अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसण्यासाठी इच्छुक आहेत. ५१ सदस्यांपैकी भाजपकडे २०, काँग्रेसकडे १५, आदिवासी विद्यार्थी संघाकडे ७ तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५ सदस्य आहेत. याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षाचे २ आणि २ अपक्ष उमेदवार आहेत. भाजपला बाजुला सारत इतर पक्ष एकत्र आले तरी अध्यक्षपद कोणाला द्यायचे यावर एकमत होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
अध्यक्षपदाची निवड लांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 6:00 AM
गेल्या महिन्यात जि.प.अध्यक्षपदासाठी सोडत निघाल्यानंतर आता निवडणुकीची तारीखही लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र मुंबईत सत्तास्थापनेच्या नाट्याने अनेक वळणं घेतली. राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांवर भाजपचे वर्चस्व आहे.
ठळक मुद्देजि.प.मध्ये समीकरणाकडे बदलणार । नेतेमंडळी मुंबईत अडकून पडल्याने थांबल्या हालचाली