शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

३,४७० कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 12:36 AM

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मतदानाची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडावी यासाठी जिल्हाभरातील ३ हजार ४७० अधिकारी व कर्मचाऱ्यांना ...

ठळक मुद्देतयारी अंतिम टप्प्यात : अनुपस्थित कर्मचाऱ्यांना बजावणार कारणे दाखवा नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मतदानाची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडावी यासाठी जिल्हाभरातील ३ हजार ४७० अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणाला ३२ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. त्यामुळे त्यांना नोटीस बजावली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.मतदानासाठी ईव्हीएमचा वापर केला जातो. यावर्षी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. ही सर्व उपकरणे व्यवस्थित हाताळता यावी, त्याचबरोबर निवडणूक विभागाच्या नियमानुसार मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाचे नियम त्यांना माहित असणे आवश्यक आहे. मतदानादरम्यान निवडणूक योग्य पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांनाच पार पाडावी लागते. त्यामुळे निवडणुकीच्या कामावर नियुक्त झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देणे आवश्यक राहते.गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ३ हजार ७४० कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील १ हजार १९६ अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी ८ कर्मचारी अनुपस्थित होते. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील १ हजार ३७४ कर्मचाऱ्यांपैकी १३ तर अहेरी विधानसभा क्षेत्रातील १ हजार १६० कर्मचाºयांपैकी ११ अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते. या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.व्हीव्हीपॅटची माहितीईव्हीएम व व्हीव्हीपॅट वरील सेटींग संदर्भात उमेदवारांना माहिती देण्यात येत आहे. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व व्हीव्हीपॅट वरील उमेदवार सेटींग संदर्भात उमेदवार किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तींना २ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान माहिती दिली जाणार आहे.यावर्षी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे मतदान करणे नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय आहे.दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधादिव्यांगाना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी प्रशासन विविध सुविधा पुरवित आहे. अंध, मुकबधिर, शारिरीक अपंग व इतर दिव्यांगांकरीता १६४ मतदान केंद्रांवर ३६५ व्हिलचेअर उपलब्ध असणार आहेत. दिव्यांगांना स्वयंसेवकांकडून मतदान केंद्रांवर मदत पुरविली जाणार आहे. यासाठी एन.सी.सी., एन.एस.एस. व स्काऊट गाईड यातील स्वयंसेवकांकडून मदत घेण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर रँम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात अंध ११४, मुकबधीर १२७, शारिरीक अपंग ४२७ इतर अन्य ३५ असे एकूण ७०३ अपंग मतदार आहेत. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात अंध १०३, मुकबधीर ७४, शारिरीक अपंग ४६९ इतर अन्य ४४ एकूण ६९१ मतदार आहेत. अहेरी विधानसभा क्षेत्रात अंध ११३, मुकबधीर १०७, शारिरीक अपंग ४६९ इतर अन्य ९३ एकूण ८०२ मतदार आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील ६२ मतदान केंद्रांवर १३४ व्हिलचेअर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील ४९ मतदान केंद्रांवर व्हिलचेअर ४९ व अहेरी विधानसभा क्षेत्रातील ५३ मतदान केंद्रांवर १८२ व्हिलचेअर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने दिली आहे. व्हिलचेअरमुळे दिव्यांगांसाठी सोयीचे झाले आहे.

टॅग्स :VVPATव्हीव्हीपीएटी