लोकमत न्यूज नेटवर्कमुरूमगाव : धानोरा तालुक्याच्या मुरूमगाव परिसरात शुक्रवारी जोरदार वादळ आल्याने आमपायली रस्त्यालगतचे चार विद्युत खांब कोसळले. परिणामी या भागातील वीज खंडित झाली. त्याबरोबरच भ्रमणध्वनी सेवा ठप्प पडल्याने येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.मुरूमगावपासून पाच किमी अंतरावरील आमपायली बसथांब्याजवळ वादळामुळे चार वीज खांब कोसळले. परिणामी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. त्याबरोबरच रस्त्यावरील झाडे तारांवर पडल्याने तारा तुटल्या. परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने भ्रमणध्वनी टॉवर बंद पडले. बीएसएनएलकडून टॉवरस्थळी जनरेटरची व्यवस्था नसल्याने वीज पुरवठा खंडित होताच टॉवर बंद पडते. परिणामी या भागातील भ्रमणध्वनी ग्राहकांना सेवेपासून वंचित राहावे लागते.ग्रामीण भागातही लोकसभा निवडणुकीचा ज्वर असल्याने नागरिक सोशल मीडियावर सक्रीय असतात. या माध्यमातून विविध माहिती ते जाणून घेतात. मुरूमगाव परिसरात बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. त्याबरोबरच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्रीच्या सुमारास प्रचंड उकाडा सहन करावा लागतो. अशावेळी वीज पुरवठा असणे आवश्यक असते. उकाड्यापासून मुक्ती मिळावी, तसेच इतरांशी संपर्क साधताना अडचणी येऊ नयेत, यासाठी मोबाईल टॉवर सुरू राहावे म्हणून वीज पुरवठा त्वरित सुरू करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.कर्मचारी लागले कामालाआमपायली रस्त्यालगत कोसळलेल्या विद्युत खांब जोडण्याचे प्रयत्न केले जातील. वरिष्ठांकडून मदत मागवून जोडणी करून पुरवठा पूर्ववत केले जाईल, असे कनिष्ठ अभियंता भूनेश्वर मेश्राम यांनी सांगितले. लगेच लाईनमन विनोद खुरसे, खिलोज बारसागडे, दयालुराम भक्ता घटनास्थळी दाखल झाले व कामाला सुरूवात केली.
विद्युत व भ्रमणध्वनी सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 12:08 AM
धानोरा तालुक्याच्या मुरूमगाव परिसरात शुक्रवारी जोरदार वादळ आल्याने आमपायली रस्त्यालगतचे चार विद्युत खांब कोसळले. परिणामी या भागातील वीज खंडित झाली. त्याबरोबरच भ्रमणध्वनी सेवा ठप्प पडल्याने येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
ठळक मुद्देमुरूमगाव परिसर : वादळामुळे आमपायलीत चार खांब व अनेक झाडे कोसळली