लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या त्याचबरोबर दुर्गम भागात अधिक प्रमाणात विजेची गळती (वाणिज्य वितरण हानी) होत असल्याचे वीज विभागाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.वीज विभागाच्या मार्फत जेवढी वीज निर्माण केली जाते, तेवढीच वीज ग्राहकापर्यंत पोहोचून तेवढ्या विजेचे पैसे महावितरणकडे जमा होणे आवश्यक आहे. जेवढे जास्त अंतर तेवढी वीजेची हानी अधिक होते. त्याचबरोबर काही नागरिक आकोडे टाकून विजेची चोरी करतात. तर काही ठिकाणी नियमितपणे वीज बिल भरल्या जात नाही. या सर्व नैसर्गिक व मानव निर्मित कारणांमुळे जेवढी वीज निर्मिती होते, तेवढ्या विजेचे पैसे महावितरणला मिळत नाही. याला त्याला वाणिज्य वितरण हानी असे संबोधल्या जाते.गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अधिक प्रमाणात वीज गळती होत असल्याचे दिसून आले आहे. दुर्गम भागात वीज कर्मचारी सहजासहजी पोहोचत नाही. परिणामी नागरिक खुलेआम आकोडे टाकून विजेची चोरी करतात. वाणिज्य वितरण हानीनुसार वीज विभागाने ‘ए’ ते ‘जी’ पर्यंत ग्रुप पाडले आहेत. त्यापैकी सीमावर्ती भागात असलेल्या तसेच ग्रामीण भागातील काही फिडरवरून सर्वाधिक गळती होत असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली तालुक्यातील पोर्ला, आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा, देसाईगंज, कुरखेडा तालुक्यातील घाटी, सुरसुंडी, अंगारा, कोरची तालुक्यातील कोटरा, बिहिटेकला, धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी या फिडरवरून अधिक प्रमाणात वीज गळती होत असून यातील बरेचसे फिडर ‘बी’ ग्रुपमध्ये व काही फिडर ‘सी’ ग्रुपमध्ये आहेत.जिल्ह्यातील बहुतांश फिडर ‘ए’ ग्रुपमध्येचवाणिज्य वितरण हानीनुसार वीज विभागाने ‘ए’ ते ‘जी’ पर्यंतचे ग्रुप पाडले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये एकूण वीज निर्मितीच्या ५० टक्के वाणिज्य वितरण हानी असल्याचे दिसून येते. त्यामुळे सदर फिडर ‘एफ’, ‘जी-१’, ‘जी-२’, ‘जी-३’ यासारख्या श्रेणीमध्ये मोडतात. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील ९० टक्के फिडर ‘ए’ ग्रुपमध्ये आहेत. म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यात वाणिज्य वितरण हानी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. काही फिडर ‘बी’ व ‘सी’ मध्ये आहेत. याचा अर्थ गडचिरोली जिल्ह्यात विजेची चोरी कमी प्रमाणात होत असून नागरिक वीज बिलाचा भरणा वेळेवर करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.वीज गळतीनुसार भारनियमनज्या भागात अधिक वीज गळती तेथे अधिक भारनियमनाचा नियम वीज विभागाने सुरू केला आहे. सद्य:स्थितीत ‘ए’ स्थितीतील गळतीच्या फिडरवर ३.१५ तास, ‘बी’ स्थितीतील फिडरवर ४ तास, ‘सी’ श्रेणीतील फिडरवर ४.४५ तास, ‘डी’ श्रेणीतील फिडरसाठी ५.३० तास, ‘ई’ श्रेणीसाठी ६.१५ तास, ‘एफ’ ७ तास, ‘जी-१’ ७.४५ तास, ‘जी-२’ साठी ८.३० तास व ‘जी-३’ श्रेणीसाठी ९.१५ तास भारनियमन केले जात आहे.वीज गळतीनुसार भारनियमनाचे तास ठरविण्यात आले आहेत. अधिक वीज गळती असल्यास अधिक भारनियमन केले जाते. त्यामुळे भारनियमन टाळण्यासाठी नागरिकांनी विजेची चोरी करू नये. चोरी वीज कर्मचाºयांच्या लक्षात आणून द्यावी, त्याचबरोबर बिलाचा भरणा नियमित करावा.- अशोक म्हस्के, अधीक्षक अभियंता,महावितरण, गडचिरोली
सीमावर्ती भागात वीज गळती अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 1:28 AM
छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या त्याचबरोबर दुर्गम भागात अधिक प्रमाणात विजेची गळती (वाणिज्य वितरण हानी) होत असल्याचे वीज विभागाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
ठळक मुद्देमहावितरणचे सर्वेक्षण : गळतीनुसार फिडरची श्रेणी