लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कर्मचाऱ्यांच्या निवासाकरिता पेंढरी येथे कर्मचारी वसाहतीचे बांधकाम पाच वर्र्षांपूर्वी हाती घेण्यात आले. परंतु अद्यापही या वसाहतीचे बांधकाम पूर्ण झाले नाही. अधिकारी व संबंधित कंत्राटदाराच्या बेजबाबदारापणामुळे वसाहतीचे बांधकाम संथगतीने सुरू आहे, असा आरोप जि. प. सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनी केला आहे.तालुका मुख्यालयापासून ५० किमी अंतरावर पेंढरी येथे विद्युत कर्मचाऱ्यांच्या निवासाकरिता इमारत मंजूर करण्यात आली. परंतु पाच वर्ष उलटूनही सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नाही. येथे ३३ केव्ही विद्युत केंद्राचे काम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी वसाहत आवश्यक होती. परंतु संथगतीने सुरू असलेले बांधकाम अद्यापही पूर्ण न झाल्याने कर्मचाऱ्यांना खासगी इमारतींमध्ये भाड्याने राहण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, पेंढरी येथे सुविधायुक्त खासगी इमारती नसल्याने कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे बांधकाम पूर्ण करून सदर इमारत विद्युत कंपनीला हस्तांतरित करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जि. प. सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनी दिला आहे.
वीज कर्मचारी वसाहतीचे बांधकाम संथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 1:35 AM
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कर्मचाऱ्यांच्या निवासाकरिता पेंढरी येथे कर्मचारी वसाहतीचे बांधकाम पाच वर्र्षांपूर्वी हाती घेण्यात आले. परंतु अद्यापही या वसाहतीचे बांधकाम पूर्ण झाले नाही. अधिकारी व संबंधित कंत्राटदाराच्या बेजबाबदारापणामुळे वसाहतीचे बांधकाम संथगतीने सुरू आहे, असा आरोप जि. प. सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनी केला आहे.
ठळक मुद्देपाच वर्षांपासून सुरूच : बेजबाबदारपणे काम सुरू असल्याचा जि.प. सदस्यांचा आरोप