शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

हत्तींनी पुन्हा केली ट्रॅक्टरमधील धानाची नासधूस, रात्रभरात ५० पाेती केली फस्त

By गेापाल लाजुरकर | Published: November 24, 2023 9:48 PM

शेतकऱ्यासह ट्रॅक्टरमधील सर्व मजुरांनी पळ काढल्याने रात्रीतून सर्व ५० ते ५५ पाेती धान हत्तींच्या कळपाने फस्त केली.

गडचिराेली : आरमोरी तालुक्याच्या डार्ली येथील शेतकरी सदाशिव शंकर सडमाके हे २३ नाेव्हेंबर राेजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मळणी केलेले धान भाड्याच्या ट्रॅक्टरद्वारे घराकडे आणत हाेते. दरम्यान, एक रानटी हत्ती रस्त्यात आडवा आला. शेतकऱ्यासह ट्रॅक्टरमधील सर्व मजुरांनी पळ काढल्याने रात्रीतून सर्व ५० ते ५५ पाेती धान हत्तींच्या कळपाने फस्त केली.सदाशिव सडमाके हे गुरूवारी रात्री ८ वाजता ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये धानाचे पाेते भरून घराकडे आणत हाेते. दरम्यान, अचानक वाटेतच एक रानटी हत्ती आला. त्यानंतर ट्रॅक्टरवर बसलेले चार ते पाच जण भयभीत होऊन रानटी हत्तीच्या भीतीपाेटी कसेबसे पळाले. नंतर गावात येऊन घटनेची माहिती दिली. काही नागरिकांनी हत्तींना पांगवण्याचा प्रयत्न केला. परंतु, कळपापुढे काहीच शक्य झाले नाही. संपूर्ण रात्रभर हत्तींनी ट्रॅक्टर ट्राॅलीमधील धानाच्या पाेत्यांची नासधूस केली. तोंडाजवळ आलेला घास रानटी हत्तींनी हिरावल्याने शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे वन विभागाने लवकर आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत. पंचनामा करताना मरेगावचे क्षेत्रसहायक आर.टी. समर्थ, खरपीचे वनरक्षक आर.पी. कुडावले, वनमजूर एन.एस. मुघाटे, ए.ए. ठाकूर उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीPaddyभात