लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : काटली येथील मुक्तीपथ गाव संघटनेने जंगलात लपवून ठेवलेला ३० मोहफुलांचा साठा जप्त करून नष्ट केला आहे. त्याचबरोबर दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक ड्रम, सडवा, मडकी नष्ट करण्यात आले आहेत.संक्रांतीच्या निमित्ताने मोहझरी गावातील गावातील दारू विक्रेते मोठ्या प्रमाणात दारू गाळणार होते. त्यासाठी त्यांनी जंगलात मोहफुलाचा साठा लपवून ठेवल्याची माहिती काटली येथील मुक्तीपथ गाव संघटनेला प्राप्त झाली. हा साठा नष्ट करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. नवरगाव येथील पोलीस पाटील राजहंस जांभुळकर यांनीही सहकार्य केले. संघटीत झालेल्या महिलांनी मोहझरी जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहिमेत जमिनीखाली लपवून ठेवलेला तब्बल ३० पोती मोहफूल सडवा महिलांना सापडला. त्याचबरोबर दारू काढण्यासाठी वापरात येणारे ड्रम, मडकी व इतर साहित्य नष्ट केले. प्रत्येक आठवड्यात शोधमोहीम राबविली जाईल, असा निर्णय संघटनेने घेतला. मोहफूल सडवा नष्ट करण्याच्या कामात मंगला धानोरकर, बाळकृष्ण डोईजड, तारा कोलते, दुर्गा धानोरकर, माया मानकर, बकूबाई भोयर, दुमनबाई गायकवाड, ललिता कुरडकर, गीता कोहपरे, इंदिरा बांगरे, माया कोटगले, निर्मला धरणे, रेखा ठाकरे, माया जराते यांनी पुढाकार घेतला.
मोहझरीत ३० पोती मोहफूल साठा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:33 PM
काटली येथील मुक्तीपथ गाव संघटनेने जंगलात लपवून ठेवलेला ३० मोहफुलांचा साठा जप्त करून नष्ट केला आहे. त्याचबरोबर दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक ड्रम, सडवा, मडकी नष्ट करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देदारू निर्मितीचे साहित्य जप्त : काटली गाव महिला संघटनेचा पुढाकार