येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोतदार यांनी येथील सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही, पण स्थानिकांना रोजगार मिळत नसेल, तर हे निराशाजनक आहे. स्थानिकांनाच प्राधान्य देऊन उत्खनन करा व कोनसरीत लोहप्रकल्प उभारा, अन्यथा काम बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी खाणीची लीज मिळालेल्या लॉयड्स मेटल्स कंपनीला उद्देशून दिला.
सुरजागड लोहप्रकल्प येथील युवकांच्या रोजगारासाठी एक पर्वणी ठरणार आहे. शैक्षणिक कौशल्य व योग्यतेनुसार आणि वेळप्रसंगी येथील युवकांना कंपनी प्रशिक्षित करून स्थानिकांनाच सुरजागडच्या कामावर समाविष्ट करावे. जवळपास २०० वर्षे चालणाऱ्या या प्रकल्पामुळे स्थानिकांचे भले व्हावे, अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप, अहेरी विधानसभा जिल्हाप्रमुख रियाज शेख, गडचिरोली विधानसभा जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्यासह विलास टोंबरे, अरुण धुर्वे, बिरजू गेडाम, रामशहा मडावी, तुळजा तलांडे, पौर्णिमा इष्टाम, सुभाष घुटे, दिलीप सुरपाम, प्रफुल्ल येरणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
(बॉक्स)
मेडिगट्टा प्रकल्प सिरोंचा तालुक्यासाठी मारक
मागील सरकारने मेडिगट्टा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याने व रस दाखविल्याने मोठा प्रकल्प उभा झाला खरा, पण हाच प्रकल्प सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. बॅक वॉटरमुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांत व शेतातील उभ्या पिकात पाणी शिरत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तेलंगणा शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाईची व दरवर्षी सिरोंचा भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी उपाययोजनेची गरज असल्याचेही पोतदार यांनी सांगत हा मेडिगड्डा प्रकल्प वरदान ठरण्याऐवजी मारक ठरत असल्याची नाराजी व्यक्त केली.
030721\img-20210703-wa0066.jpg
पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेचे पदाधिकारी