शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

लोह प्रकल्पात स्थानिकांनाच रोजगार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:23 AM

येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोतदार म्हणाले, येथील सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही, पण स्थानिकांना रोजगार ...

येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोतदार म्हणाले, येथील सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही, पण स्थानिकांना रोजगार मिळत नसेल, तर हे निराशाजनक आहे. स्थानिकांनाच प्राधान्य देऊन उत्खनन करा व कोनसरीत लोह प्रकल्प उभारा, अन्यथा काम बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरू, असे ते खाणीची लीज मिळालेल्या लॉयड्स मेटल्स कंपनीला उद्देशून म्हणाले.

सुरजागड लोह प्रकल्प येथील युवकांच्या रोजगारासाठी एक पर्वणी ठरणार आहे. शैक्षणिक कौशल्य व योग्यतेनुसार आणि वेळप्रसंगी येथील युवकांना कंपनीने प्रशिक्षित करून स्थानिकांनाच सुरजागडच्या कामावर समाविष्ट करावे. जवळपास २०० वर्षे चालणाऱ्या या प्रकल्पामुळे स्थानिकांचे भले व्हावे, अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप, अहेरी विधानसभा जिल्हाप्रमुख रियाज शेख, गडचिरोली विधानसभा जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्यासह विलास टोंबरे, अरुण धुर्वे, बिरजू गेडाम, रामशहा मडावी, तुळजा तलांडे, पौर्णिमा इष्टाम, सुभाष घुटे, दिलीप सुरपाम, प्रफुल्ल येरणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

(बॉक्स)

मेडिगट्टा प्रकल्प सिरोंचा तालुक्यासाठी मारक

मागील सरकारने मेडिगट्टा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याने व रस दाखविल्याने मोठा प्रकल्प उभा झाला खरा, पण हाच प्रकल्प सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. बॅक वॉटरमुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांत व शेतातील उभ्या पिकात पाणी शिरत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तेलंगणा शासनाकडून योग्य ती भरपाई देऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही पोतदार यांनी सांगत मेडिगड्डा प्रकल्प वरदान ठरण्याऐवजी मारक ठरत असल्याचे सांगितले.

030721\1849img-20210703-wa0066.jpg

पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेचे पदाधिकारी