शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरे घरातील, महायुतीने समर्थन द्याव"; BJPच्या मागणीवर शिंदे गट म्हणतो, "सरवणकरांना डावलणं..."
2
"पत्र इंग्रजीत लिहा, मला हिंदी येत नाही", केंद्रीय मंत्र्यांच्या पत्राला द्रमुक खासदाराने दिले उत्तर!
3
मविआचेच ठरेना, त्यात मित्रपक्षाचा अल्टिमेटम; वेगळा निर्णय घेण्याची तयारी? चर्चांना उधाण
4
Relationship: डिजिटल कंडोम लाँच झाला; त्या क्षणांवेळी कसा वापर करायचा? पार्टनरही राहणार सुरक्षित
5
Fake Amul Ghee Packet: ऐन दिवाळीतच अमूलचं बनावट तूप बाजारात; खुद्द अमूलनंच सांगितलं, कसं ओळखाल...
6
मोठी घडामोड! अनंत अंबानींनी घेतली फडणवीसांची भेट; मध्यरात्री दोन तास चर्चा
7
Ashish Shelar : "आपल्याच घरचा मुलगा निवडून आणू, अमित ठाकरेंना महायुतीने समर्थन द्यावं"
8
काँग्रेसला कमी वाटा, राहुल गांधी नाराज? संजय राऊत म्हणाले, “आम्ही तोलामोलाचे आहोत...”
9
Sushma Andhare : "सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले, हा विचार मनुवादी..."; सुषमा अंधारे कडाडल्या
10
IND vs NZ : टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला
11
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!
12
Diwali Astro 2024:आजचा शनिवार दिवाळीचा 'बोनस' देणारा; शश राजयोगाचा 'बाराही' राशींना लाभच लाभ!
13
ओलाचा दिवाळी धमाका...! बंगळुरूत शोरुमसमोरच स्कूटर पेटली, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया...
14
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
15
१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
16
"पाकिस्तानी लोकांना भारतीय सैन्य दहशतवादी वाटतात कारण..."; साई पल्लवीचं वक्तव्य चर्चेत
17
AUS vs IND, Border Gavaskar Test series : टीम इंडियानं दाखवला या ३ नव्या चेहऱ्यांवर भरवसा
18
Afcons Infrastructure IPOची सुस्त सुरुवात, Hyundai आयपीओ की GMP; गुंतवणूकदारांना कसली भीती?
19
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
20
PAK vs ENG : इंग्लंडची दाणादाण, पाकिस्ताननं रचला इतिहास; अखेर शेजाऱ्यांनी मालिका जिंकली

वेतनाविना कर्मचारी संकटात

By admin | Published: June 10, 2016 1:28 AM

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या खासगी अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक ...

तीन महिन्यांचे वेतन नाही : प्रकल्प कार्यालयाकडून दिरंगाईआरमोरी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या खासगी अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्च ते मे २०१६ या तीन महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे. प्रकल्प कार्यालयाच्या सततच्या दिरंगाईमुळे आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. गडचिरोली प्रकल्प कार्यालयामार्फत खासगी अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन तीन लेखाशिर्षकामध्ये विभागून दिले जाते. शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नाही, असे कारण पुढे करून अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन अदा करण्यात आले नाही. अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत प्रकल्प कार्यालय संवेदनशील नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन तीन ते चार महिन्यांच्या अंतराने एका महिन्याचे वेतन देण्याचा जणू प्रकल्प कार्यालयाने नियमच केलेला आहे. प्रत्येक वेळेस वेतनाबाबत कर्मचाऱ्यांना वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेली जात आहे. तीन-तीन महिने आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना मुलांचा शाळा प्रवेश, सामाजिक कार्यक्रम, लग्न समारंभ व बँकेच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मोठी अडचण जाणवत आहे. वेळेवर वेतन होत नसल्यामुळे आश्रमशाळांच्या अनेक कर्मचाऱ्यांवर उसणवार पैसे घेऊन कुटुंब चालवावा लागत आहे. दिरंगाईमुळे बँकेच्या कर्जाच्या व्याजाची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. गडचिरोली प्रकल्प कार्यालयाच्या दफ्तर दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. नियमित वेतन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)