लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील सर्व कर्मचाºयांना १९८२ व १९८४ ची निवृत्ती वेतन योजना लागू करावी, २३ आॅक्टोबर २०१७ चा वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा गडचिरोलीच्या वतीने ७ एप्रिल रोजी शनिवारला जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे सचिव बापू मुनघाटे, जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे, उपाध्यक्ष अंकूश मैलारे यांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.संघटनेच्या वतीने शिक्षक कर्मचाऱ्यांच्या डीसीपीएस कपातीच्या हिशेबाचे विवरण पत्र मिळावे, यासाठी वारंवार अधिकाºयांना निवेदने देण्यात आले. मात्र अद्यापही प्रशासनाच्या वतीने कपातीच्या हिशेबाचे विवरण पत्र प्राप्त झाले नाही, असे पदाधिकाºयांनी यावेळी सांगितले. शिक्षक कर्मचाºयांना प्रशासकीय कामे देऊ नयेत, त्याऐवजी बेरोजगार युवकांना संधी देण्यात यावी, कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करावी, आदी मागण्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.सामाजिक दायित्त्वाचा भाग म्हणून जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून संघटनेच्या वतीने ७ एप्रिल रोजी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात सकाळी ११ ते २ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे, असेही पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. या शिबिरानंतर जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने कुरखेडा येथे ८ एप्रिलला सकाळी ११ वाजता डीसीपीएस व एनपीएस धारक कर्मचाºयांचा निर्धार मेळावा तसेच रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला कैलास कोरोटे, गणेश आखाडे, युवराज तांदळे, समीर भोजे, चरणदास राठोड आदी उपस्थित होते.
जुन्या पेन्शनसाठी शनिवारी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 11:59 PM
जिल्ह्यातील सर्व कर्मचाºयांना १९८२ व १९८४ ची निवृत्ती वेतन योजना लागू करावी, २३ आॅक्टोबर २०१७ चा वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यात यावा,.....
ठळक मुद्देपत्रकार परिषद : संघटनेच्या पदाधिकाºयांची माहिती