चौकशीची मागणी : आरमोरीच्या बांधकाम विभागातील प्रकार लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : आरमोरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात १४ ते १५ कर्मचारी व अधिकारी आहेत. मात्र यातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळात गायब राहत असल्याचे दिसून येते. यामुळे ग्रामीण भागातून समस्या घेऊन आलेले नागरिक त्रस्त होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात श्रेणी १ चे सहायक अभियंता, पाच शाखा अभियंते, तीन कार्यालयीन लिपीक व इतर कर्मचारी आहेत. कार्यालयीन वेळेत सर्वच कर्मचारी गायब राहत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यानुसार सदर प्रतिनिधीने ३१ मे रोजी सकाळी ११.४० वाजता कार्यालयाला भेट दिली असता, सहायक अभियंता, शाखा अभियंता बसत असलेल्या इमारतीत एकही कर्मचारी हजर नव्हता. बाजुच्या इमारतीमध्ये सार्वजनिक रस्त्याची देखभाल करणारे एस. आर. भोंगडे हे कार्यालयीन कामात व्यस्त असल्याचे दिसून आले. त्यांना विचारणा केली असता अभियंता मोरे हे साईडवर गेले आहेत. शाखा अभियंता उरकुडे गडचिरोली येथे गेले आहेत. पगार होणार असल्याने बाकी कर्मचारी बँकेत गेले आहेत, असे सांगितले.
कार्यालयीन वेळेत कर्मचारी गायब
By admin | Published: June 03, 2017 1:13 AM