ऑनलाईन लोकमतभामरागड : तंबाखू सेवनाने शरीरावर वाईट परिणाम होतात हे एकीकडे सांगायचे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्याच तोंडात खर्रा असणार हे चित्र आता बदलेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. आरोग्य कार्यालये व आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी तंबाखूमुक्त व्हावे यासाठी जागतिक मौखिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन करण्यात आले व यावेळी कर्मचाºयांनीही तंबाखू सेवन न करण्याचा संकल्प केला.भामरागड येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा तंबाखू नियंत्रण सल्लागार डॉ. नंदू मेश्राम यांनी कोटपा कायदा, अन्न व औषध प्रश्न कायदा, बाल संरक्षण कायदा व सर्व कार्यालयांना तंबाखूमुक्त आशयाचे दर्शक फलक लावण्याबाबत सांगितले. आरोग्य कर्मचाºयांनी उपस्थितांना व्यसनमुक्त राहण्याबाबत चित्रफितीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.यावेळी आशा, आशा प्रवर्तक, नर्स, भामरागडच्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचाºयांना मार्गदर्शन करण्यात आले. खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे जिल्ह्यातील प्रमाण अधिक आहे. परंतु कर्करोगाच्या प्राथमिक स्वरूपातील लक्षणे असलेली अनेक रूग्ण भामरागड तालुक्यात आढळल्याचे निरीक्षनांती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, इतरांनाही या व्यसनापासून परावृत्त करावे, असे आवाहन जागतिक मौखिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.२० मार्च ते ३ एप्रिल २०१८ या कालावधीत पंधरवडा जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी डॉ. मिलिंद मेश्राम, भैसारे, मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण व वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:45 AM