शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

कर्मचाऱ्यांचा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला

By admin | Published: February 07, 2016 2:16 AM

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने १ नोव्हेंबर २००५ नंतर नोकरीत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ....

निवेदन दिले : २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करागडचिरोली : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने १ नोव्हेंबर २००५ नंतर नोकरीत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात हजारो कर्मचाऱ्यांनी नारेबाजी करून जिल्हा कचेरीवर धडक दिली.कर्मचाऱ्यांचा सदर मोर्चा दुपारी २ वाजता येथील इंदिरा गांधी चौकातून चंद्रपूर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्गदर्शन सभेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणावर ताशेरे ओढले. या मोर्चाचे नेतृत्व पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, चिटणीस शैलेश राऊत, राज्य समन्वयक दशरथ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश मैलारे, बापू मुनघाटे, महिला संघटिका वनश्री जाधव यांनी केले. कुठल्याही कर्मचाऱ्यांना एनपीएसचे अर्ज भरण्याची सक्ती करू नये, कर्मचाऱ्यांची एनपीएस व डीसीपीएस हप्ते कपातीची कार्यवाही बंद करावी, कपात झालेल्या रकमेचा हिशोब नियमित द्यावा व मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला जुन्या पेन्शन योजनेचा लाभ तत्काळ द्यावा, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व (माध्यमिक), जिल्हा कोषागार अधिकारी, लेखा व वित्त अधिकारी, मुख्य वनसंरक्षक व प्रकल्प अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. या मोर्चात प्रशांत दीडसे, कैलाश कोरोटे, किशोर मोदक, ज्ञानेश्वर हाडोळीकर, शिवाजी जाधव, विकास दोडके, शरद भेंडारे, सतीश खाटेकर, धनराज मोगरकर, त्रिमूर्ती भिसे, सुधाकर वेलादी, संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकर बाजोड, गणेश आखाडे, नीलेश शेंडे, विठ्ठल होंडे, मोहन देवकते, राजेश्वर पदा, दीपक पुंगाटी, अशोक बोरकुटे, जितेंद्र कोहळे, सुधाकर दुर्वा, हिवराज बनकर, संदीप गराटे आदीसह वन, शिक्षण, आरोग्य, पंचायत, महसूल, बांधकाम, समाज कल्याण व खासगी संस्थांमध्ये कार्यरत जवळपास दीड हजार कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)