लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. मात्र सदर पेन्शन योजना अन्यायकारक असल्याने जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, अशी मागणी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.जुनी पेन्शन लागू करावी, यासाठी १८ डिसेंबर २०१७ ला नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनात ५० हजार कर्मचाऱ्यांचा मुंडन आक्रोष मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिले. मात्र तीन महिने उलटून कोणताही निर्णय झाला नाही. ५ मे २००९ नुसार केंद्र शासनाने मृत कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन लागू केली आहे. त्याचबरोबर राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड तसेच आसाम शासनाने मृत कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. त्याच धरतीवर राज्य शासनानेही १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी केली. निवेदन देतेवेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष योगेश शेरेकर, जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे, सल्लागार गोवर्धन, विजय मुडपल्लीवार, सचिव बापू मुनघाटे, सतीश खाटेकर, रमेश रामटेके, गणेश आखाडे, रमेश जेंगठे हजर होते.
कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 1:36 AM
१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाºयांना अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. मात्र सदर पेन्शन योजना अन्यायकारक असल्याने जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, ......
ठळक मुद्देपेन्शन हक्क संघटना : मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना निवेदन