शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कर्मचाऱ्यांनी समन्वयातून काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:33 AM

अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी हे विकासाच्या रथाची चाके आहेत. त्यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन समन्वयातून काम केल्यास विकासाची गती वाढेल, असे प्रतिपादन करीत विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात हयगय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, ...

ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : विविध मुद्यांवर गाजली आरमोरी पंचायत समितीची आमसभा
<p>लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी हे विकासाच्या रथाची चाके आहेत. त्यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन समन्वयातून काम केल्यास विकासाची गती वाढेल, असे प्रतिपादन करीत विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात हयगय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी ताकिद आ. कृष्णा गजबे यांनी दिली.आरमोरी पंचायत समितीची वार्षिक आमसभा शुक्रवारी तालुका क्रीडा संकुलाच्या सभागृहात गुरूवारी पार पडली. यावेळी पं. स. सभापती बबीता उसेंडी, उपसभापती यशवंत सुरपाम, जि. प. सदस्य संपत आळे, मनीषा दोनाडकर, वनिता सहाकाटे, मितलेश्वरी खोब्रागडे, नायब तहसीलदार प्रकाश डांगे, पं. स. सदस्य विवेक खेवले, विनोद बावनकर, वृंदा गजभिये, नीता ढोरे, रूपमाला वट्टी, किरण म्हस्के, माजी जि. प. सदस्य अमोल मारकवार, माजी पं. स. सभापती बग्गु ताडाम, नंदू पेट्टेवार, पंकज खरवडे, रोशनी बैैस, संगीता रेवतकर, बीडीओ यशवंत मोहीतकर, सहायक बीडीओ एम. ई. कोमलवार, पोलीस निरीक्षक महेश पाटील उपस्थित होते.ध्वनी क्षेपकाचे योग्य नियोजन नसल्यामुळे आमसभेत कोण काय बोलणार हे स्पष्ट न झाल्याने गोंधळ उडाला. आमसभेला उपस्थित नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आ. कृष्णा गजबे यांनी दिल्या.दोन वर्षांपूर्वी गाजलेला मुद्या याही ग्रामसभेत गाजला. गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांच्यावर कारवाईचा ठराव मागील आमसभेत घेण्यात आला होता. परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. या विषयावर वादळी चर्चा झाली. तालुक्यातील अनेक जि. प. शाळेच्या इमारतीच्या निर्लेखनाचा प्रस्ताव पाठविण्यात कसूर केल्याचा ठपका परसा यांच्यावर ठेऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा ठराव घेण्याचे आदेश आ. कृष्णा गजबे यांनी दिले.सीमांकनासह बांधकामाचा प्रश्न उपस्थितपशुधन विस्तार अधिकारी गैरहजर राहत असल्याने योजनांची अंमलबजावणी होण्यास अडचण येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, आरमोरी ते शिवणी रस्त्याचे काम निकृष्ट करण्यात आले. त्यामुळे या कामाची चौकशी करावी, अशी मागणी भारत बावनथडे यांनी केली असता, सदर रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करण्याचा ठराव घेण्यात आला. वघाळा गावाचे सीमांकन करणे, तसेच याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर यांनी केले. मागणी पूर्ण न झाल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.