धानाेरा : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियान १ ते १५ जानेवारीपर्यंत राबविले जात आहे. या अभियानांतर्गत धानाेरा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शपथ घेऊन वसुंधरा हिरवीगार ठेवण्याची शपथ घेतली. तहसीलदार सी.जी.पित्तुलवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी नायब तहसीलदार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे प्रत्येकाने दरवर्षी किमान पाच झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण करावे तसेच परिसर स्वच्छ ठेवावा. पिण्याच्या पाण्याचा वापर याेग्य करावा, प्लास्टिकचा वापर टाळावा, ऊर्जा कार्यक्षम दिव्यांचा वापर करावा, कार्यालय परिसर दारू व तंबाखूमुक्त करून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड ठाेवावा, असे मार्गदर्शन तहसीलदार पित्तुलवार यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार दादाजी वाकुडकर, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, वनिश्याम येरमे उपस्थित हाेते.
धानाेरा येथे कर्मचाऱ्यांनी घेतली ‘हरित’ शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:35 AM