शासनामार्फत काही घटकांसाठी तिकीट सवलतीच्या याेजना राबाविल्या जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० टक्के सवलत, अपंगांसाठी ७५ टक्के सवलत, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ६६ टक्के तिकीट सवलत व विद्यार्थिनींसाठी १०० टक्के माेफत पास सवलत याेजना आदी योजना रावबिल्या जातात. सवलतीची रक्कम वगळता उर्वरित रक्क्कम संबंधित लाभार्थीला भरावी लागते. सवलतीची रक्कम शासनाकडून एसटी महामंडळाला दिली जाते.
गडचिराेली आगारात मानव विकास मिशनच्या जवळपास ४९ बसेस आहेत. या बसेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची माेफत वाहतूक केली जाते. शासनाकडून एसटी महामंडळाला प्रतिबस ६४ हजार रुपये महिना दिला जाते. महिन्याचे एसटी महामंडळाला शासनाकडून ३१ लाख रुपये येणे राहते. ही रक्कम एसटीच्या केंद्रीय कार्यालयामार्फत शासनाकडून वसूल केली जाते.
बाॅक्स
चामार्शी तहसील कार्यालयाकडे शिल्लक
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी चामाेर्शी तहसील कार्यालयाला गडचिराेली आगाराच्या काही बसेस भाड्याने दिल्या हाेत्या. त्यासाठी अडीच लाख रुपये येणे शिल्लक आहेत. एसटी महामंडळ आता आर्थिक अडचणीत सापडले असल्याने ही रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
काेट
एसटीची बरीच रक्कम शासनाकडे शिल्लक आहे. एसटी आता आर्थिक अडचणीत असल्याने शासनाने तसेच इतरही विभागाने थकीत रक्कम देण्याची गरज आहे.
दीपक मांडवे, एसटी कर्मचारी
काेट
ग्रामीण भागाला शहरासाेबत जाेडण्याचे एसटी हे अतिशय महत्त्वाचे साधन आहे. काेराेनामुळे एसटीची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. शासन ज्याप्रमाणे इतर घटकांना मदत करीत आहे तसेच एसटीलाही आर्थिक मदत करण्याची गरज आहे.
मानिक सिडाम, एसटी कर्मचारी
जिल्ह्यातील एकूण आगार - २
एकूण कर्मचारी - ४९१
सध्याचे दरराेजचे उत्पन्न - २०,०००
महिन्याला पगारावर हाेणार खर्च - १ काेटी ५० लाख