पूर्वी जास्त प्रमाणात महिला मिरची तोडणी करीता परराज्यात जात असत. पण अनेकांनी कोरोनाचे संकट कोसळले असल्याने रोजगार हमी योजनेला पसंती दर्शवत रोजगार हमीच्या कामावर हजेरी लावत आहेत. तहसील यंत्रणा व पंचायत यंत्रणा दोन स्तरावर काम सुरू करण्यात आली आहेत. तालुक्यात तहसील यंत्रणांची ११ कामे तर पंचायत स्तरावरही काही कामे सुरू आहेत. यामध्ये भातखाचार, मजगी, नाला खोलीकरण, घरकूल , तलावाचे खोलीकरण, एकेरीकरण आदी कामांचा समावेश आहे.
एकूण १ लाख ७१ हजार मनुष्य दिवस राेजगाराची निर्मिती झाली. त्यापैकी ८५ हजार मनुष्य दिवस राेजगार महिलांनी केले आहेत. यावरून राेजगार हमी याेजनेच्या कामावर महिलांची संख्या वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.