यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक गोयल म्हणाले, जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दल सदैव तत्पर आहे. या संधीमुळे कुटुंबीयांचे जीवनमान उंचावेल. आपल्या आप्तस्वकीयांना आणि मित्रपरिवाराला याबाबतची माहिती देऊन पोलिसांच्या या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एम्स प्रोटेक्शन प्रा.लि. हैदराबादचे मलेश यादव, लाइफ सर्कल हेल्थ सर्व्हिसेसचे श्रीनिवास सुधाला, ओल्ड एज होम हैदराबादच्या अंकिता बोरकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी एपीआय महादेव शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
(बॉक्स)
आतापर्यंत १५८० जणांना रोजगार
पोलिसांच्या नागरी कृती शाखेमार्फत आतापर्यत १५८० युवक-युवतींना रोजगार मिळाला. त्यात ३७५ सुरक्षारक्षक, १०६० नर्सिंग असिस्टंट, १०० हॉस्पिटॅलिटी, ४५ ऑटोमोबाइल, तसेच १२९ युवक-युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.