भामरागड : माणसाच्या आराेग्यासाठी अतिशय लाभदायक असणाऱ्या ताडी पेय विक्रीच्या हंगामास भामरागड तालुक्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात सुरुवात झाली आहे. ताडी पेय हंगामाच्या माध्यमातून तालुक्यातील शेकडाे नागरिकांना राेजगार मिळत आहे. उन्हाळ्यामध्ये ताडीची मागणी वाढत असल्याने नागरिकांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असते. ताडी व गाेरगा हे दाेन वृक्ष अतिशय दुर्मीळ समजले जात असले तरी भामरागड तालुक्याच्या लाहेरी व इतर भागात या दाेन्ही वृक्षांची संख्या माेठ्या प्रमाणात आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात ताडी पेय उपलब्ध हाेत आहे. जानेवारीपासून तर मे महिन्यापर्यंत साधारणत: पाच महिने ताडी पेयाचा हंगाम राहणार आहे. शहरी भागातील नागरिकांना ताडीचे विशेष आकर्षण आहे. ताडी हे पेय चवीला चांगले असून, आराेग्यासाठी लाभदायक असल्याने याला माेठी पसंती आहे.
ताडी हंगामातून अनेकांना राेजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:35 AM